Share

गांधींनी दाखवलेल्या मार्गापासून देश भटकला होता, मोदींनी परत मार्गावर आणला- अमित शहा

amit shah

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे अहमदाबाद दौऱ्यावर आहे. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल असे एक वक्तव्ये केले आहे, ज्यामुळे ते चर्चेत आले आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) तसेच अनेक सरकारी प्रकल्प आणि योजनांमध्ये महात्मा गांधींच्या तत्त्वांचा समावेश केला आहे, त्यानंतर त्यांनी मोदींवर भाष्य केले आहे. (amit shaha on mahatma gandhi)

शहा यांनी अहमदाबादच्या पालडी भागातील कोचरब आश्रमात एका कार्यक्रमाला संबोधित केले आहे. ते महात्मा गांधींच्या मीठ सत्याग्रहाच्या ९२ व्या वर्धापन दिनानिमित्त दक्षिण गुजरातमधील दांडी येथे सायकल रॅलीला झेंडा दाखवण्यासाठी आले होते. या रॅलीअंतर्गत १२ सायकलस्वार दांडीयात्रा मार्गावरून जात असताना महात्मा गांधींचा संदेश देणार होते.

यावेळी सर्वांना संबोधित करताना अमित शहा म्हणाले, जर भारताने सुरुवातीपासूनच गांधींनी दाखविलेल्या मार्गावर चालले असते, तर देशाला सध्या ज्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. समस्या ही आहे की आपण गांधींनी दाखवलेल्या मार्गापासून भरकटून गेलो आहोत. पंतप्रधान मोदींनी नव्या शैक्षणिक धोरणात गांधींच्या आदर्शांचा समावेश केला आहे.

पुढे अमित शहा म्हणाले की, मिठाच्या सत्याग्रहादरम्यान खेडोपाडी रात्रीच्या मुक्कामात गांधींनी सर्वसामान्यांच्या समस्या ऐकून घेतल्या. या समस्या समजून घेतल्यानंतर त्यांनी त्यावर उपाय शोधून काढले आणि ते उपाय आपल्या भाषणातून लोकांपर्यंत पोहोचवले. पंतप्रधान झाल्यानंतर मोदींनीही तेच केले आहे.

तसेच ग्रामस्थांच्या उन्नतीसाठी, गावांना स्वावलंबी बनवणे आणि प्रत्येक घरात वीज, पाणी आणि शौचालयाची सुविधा उपलब्ध करून देणे या सरकारी योजना पाहिल्या तर तुम्हाला गांधीवादी विचार आणि आदर्शांची झलक त्यांच्यात दिसेल, असे अमित शहा यांनी मोदींबद्दल म्हटले आहे.

यावेळी सायकल रॅलीतील सहभागींना त्यांच्या रात्रीच्या मुक्कामादरम्यान लोकांशी संवाद साधावा. त्यांच्या समस्या समजून घ्याव्यात आणि त्यांच्यात गांधीवादी तत्त्वांबद्दल जागृती करावी, असे आवाहनही अमित शहा यांनी केले. दहा वर्षांनंतर अमित शहा यांनी या आश्रमाला भेट दिली आहे.

महत्वाच्या बातम्या-
अक्षय कुमारचे बॉडी डबलचे काम करायचा ‘हा’ डायरेक्टर, आता अक्षय त्याच्याच चित्रपटात काम करतो
हिजाब निकालावर कॉंग्रेसचा संतप्त सवाल; श्रीमंत मुस्लिमांच्या मुली परदेशात शिकताना हिजाब घालतात का?
वॉरेन बफेंची कमाल! २० डॉलरच्या शेअरची किंमत पोहचली पाच दशलक्ष डॉलर्सवर, बनला जगातील सर्वात महागडा शेअर

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now