Share

Politics: भाजप मनसेची युती होणार? मुंबई दौऱ्यादरम्यान अमित शहा घेणार राज ठाकरेंची भेट?

amit shah raj thakre

राजकारण(Politics): सत्तांतरणानंतर राज्यातील राजकारणात मोठे बदल घडून आले. सगळ्यात मोठा बदल म्हणजे शिवसेनेचे दोन गट निर्माण झाले. त्यामुळे अनेक बाबतीत वादही होत आहे. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारणात मोठे बदल घडून येण्याची शक्यता आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा ४ ते ५ सप्टेंबरला मुंबई दौरा असणार आहे. यादरम्यान अमित शाह व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट होण्याची शक्यता आहे.

भाजपचे अनेक नेते व राज ठाकरे यांच्यात भेटी झाल्याचे समोर आले होते. काही दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राज ठाकरेंची भेट घेतली. त्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही राज ठाकरेंची भेट घेतली होती. आता अमित शाह आणि राज ठाकरे यांच्या भेटीची शक्यता आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीआधी भाजप मनसेच्या युतीची शक्यता आहे.

मनसेच्या गोटातून अमित शाह यांच्या भेटीसाठी प्रयत्न केला जात आहे. काल (गुरुवार) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज ठाकरे यांच्या शिवतीर्थवर गेले होते. ते गणेशाच्या दर्शनासाठी गेले असल्याचे काल माध्यमांशी बोलताना त्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की, राज ठाकरेंना भेटून जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. जवळपास पाऊण तास मुख्यमंत्री व राज ठाकरे यांच्यात चर्चा झाली. यांच्या भेटीमुळे भाजप व मनसेची युती होणार का? या चर्चेला अधिकच उधाण आले आहे.

भाजपने शिंदे गटासोबत सरकार स्थापन केल्यानंतर मनसे-भाजपच्या भेटीगाठी वाढताना दिसत आहे. अशात आता मनसे आणि भाजपची युती होईल का? असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. याबाबत अनेक नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत. रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष व केंद्रिय मंत्री रामदास आठवले एका खासगी वाहिनीला मुलाखत देताना म्हणाले की, भाजपासारख्या पक्षाला राज ठाकरेंची गरज नाही.

भाजप-मनसे युती घडून आली तर भाजपाला फायद्यापेक्षा नुकसान जास्त होईल. मुंबईतल्या मराठी माणसांचा विचार करून राज ठाकरेंना भाजप जवळ घेत असेल तर, राष्ट्रीय स्तरावर पक्षाला याचा खूप मोठा फटका बसू शकतो. मनसे सोबत भाजपने युती केली तर त्यांना उत्तर भारतीय तसेच दक्षिण भारतीय मते मिळणार नाहीत, असेही आठवले म्हणाले.

पुढे ते म्हणाले, राज ठाकरेंना सोबत घेतलं तर राष्ट्रीय स्तरावर पक्षाला नुकसान होऊ शकतं. राज ठाकरेंची भूमिका मराठीच्या मुद्दयासाठी महत्त्वाची आहे. पण मुंबईतल्या अमराठी लोकांना विरोध करण्याच्या भूमिकेमुळे भाजपाला हे परवडणारे नाही. अशा अनेक टीका भाजप व मनसेच्या युतीबाबत होत आहेत.

महत्वाच्या बातम्या
NCP : आघाडीत बिघाडी! मिटकरींचा एका महिलेच्या प्रकरणातील व्हिडीओ माझ्याकडे, NCP पदाधिकाऱ्याचा दावा
Lonavala: सर्वांना खळखळून हसवणारा लक्ष्या शेवटच्या दिवसांत पडला होता एकटा, वाचा लोणावळ्यात काय झालं होतं
ग्राहकाने मुस्लिम डिलिव्हरी बॉयकडून जेवण घेण्यास दिला स्पष्ट नकार; अन् केलं असं काही केली वाचून तुम्हाला येईल चीड
“हे योग्य आहे का ? ३५ वर्षे काम केलेल्या निष्ठावंतांना ३२ वर्षांच्या आदित्य ठाकरेंचं ऐकावं लागत होतं”

राज्य इतर ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now