amit shah : गृहमंत्री अमित शहा सध्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चांगलेच राजकारणात सक्रिय झालेले पाहायला मिळत आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या राज्यात जाऊन अमित शहा हे पक्षबांधणीचे काम करत आहेत. दौऱ्यादरम्यान अनेक किस्से शहा कार्यकर्त्यांना सांगत आहेत.
नुकतच अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी बेलटोला, गुवाहाटी दौऱ्यावर होते. या दौऱ्यावर असतानाच यांनी इथं पक्षाच्या नवीन कार्यालयाचं उद्घाटन केलं. यादरम्यान शहांनी तेथील कार्यकर्त्यांना देखील संबोधित केलं. यावेळी त्यांनी भर सभेत एक किस्सा सांगितला.
शहा यांनी सांगितला किस्सा आता राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे. सभेत बोलताना अमित शहा यांनी सांगितलं की, तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या विरोधात निदर्शनं करत असताना बेदम मारहाण करण्यात आल्याचं शहा यांनी यावेळी बोलताना सांगितलं.
याबाबत बोलताना पुढे शहा यांनी म्हंटलं आहे की, ‘अभाविपच्या कार्यक्रमात मी एकदा इथं आलो होतो. आम्ही त्यावेळी घोषणा देत आसामचे रस्ते सुनसान आहेत, इंदिरा गांधी खुनी आहेत, असं म्हटलं होतं. अन् त्यावेळी आम्हाला हितेश्वर सैकियानं बेदम मारहाण केली होती, हे देखील शहा यांनी सांगितलं.
दरम्यान, ‘आता याच आसाममध्ये सलग दोन वेळा भाजपचं सरकार स्थापन होईल, असं आम्हाला कधीच वाटलं नव्हतं असं देखील अमित शहा यांनी यावेळी बोलताना येथे नमूद केलं. आता यावर कॉंग्रेस नेत्यांकडून काय प्रतिक्रिया येतीये? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.