Share

२०२४ च्या निवडणूकांसाठी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसोबत जागावाटप कसं होणार? अमित शहा म्हणाले…

Amit-Shah

शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाले. त्यानंतर मुख्यमंत्री पदाची शपथ एकनाथ शिंदे यांनी घेतील. तर उपमुख्यमंत्री पद देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले.‌ यादरम्यान शिवसेनेचे दोन गट पडले. त्यावरून राजकीय वर्तुळात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. तसेच शिवसेनेसोबतची युती तसंच जागावाटप कस होणार? याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी भाष्य केल आहे

शिवसेनेचे दोन गट पडल्यानंतर खरी शिवसेना कोणाची? हा प्रश्न उपस्थित झाला. यावर निवडणूक आयोगाने निर्णय देत शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे गटाला दिले. यावेळी ठाकरे गटात प्रचंड नाराजी पसरली. ठाकरे गटाला मशाल चिन्ह देण्यात आले. यावर बोलताना अमित शहा यांना मोठ भाष्य केले आहे.

नुकताच नेटवर्क १८च्या वतीने रायझिंग इंडिया हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात अमित शाह यांची एक मुलाखत घेण्यात आली. यावेळी माध्यमांशी बोलताना अमित शहा यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत त्यांची भूमिका स्पष्ट मांडली. अमित शहा यांच्या वक्तव्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आला आहे. २०२४भाजप शिवसेनेमध्ये जागावाटप होणार कसं? यावर बोलताना शहा म्हणाले, तेव्हा जागा वाटप बसवून ठरवून, ही काही मोठी गोष्ट नाही.

अमित शहा म्हणाले, महाराष्ट्रात आम्ही आणि शिवसेनेने एकत्र निवडणूक लढवली होती. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली गेली. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचा निवडणुकीत पराभव झाले‌. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पण त्यावेळी जनतेमध्ये गेलो तेव्हा वैचारिक मतभेद समोर यायला लागले. कारण शिवसेना कित्येक वर्ष हिंदुत्वाचा राजकारण करत होती. त्यामुळे शिवसैनिक त्यांच्या लोकप्रतिनिधींना प्रश्न विचारत होता.

तसेच, आमदार खासदार तिकडून पळाले ते आमच्यामुळे पळाले नाहीत. जनतेच्या दबावामुळे ते तिकडून निघून गेले. भाजप शिवसेना एकत्र राहावी, असं जनतेलाच वाटत होतं. आता असली शिवसेना आमच्या सोबत आली आहे.शिवसेना आणि आम्ही एकत्र येऊन सरकार बनवलं. निवडणूक लढवून आणि निवडणूक जिंकू , असे भाष्य अमित शहा यांनी केले आहे.

दरम्यान, ही खरी शिवसेना आहे. त्यामुळे त्यांच्या भाजपामध्ये विलीनीकरणाचा प्रश्नच नाही. हीच खरी शिवसेना असं निवडणूक आयोगाने देखील सिद्ध केला आहे. त्यामुळे भाजप शिवसेना एकत्र निवडणुका लढतील विलीनीकरणाचा कोणताही प्रश्न नाही असा कोणताही प्रस्ताव नाही, असेही अमित शहा म्हणाले. अमित शहा यांच्या या भाष्यावर ठाकरे गटाकडून काय प्रतिक्रिया येती हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या 
पुण्यात भीषण अपघात; दारूड्या पिकअप ड्रायव्हरने ८ जनांना चिरडलं, ५ लोकं जागीच
“बाळासाहेब ठाकरेंना जमलं नाही ते आम्ही सावंत बंधूंनी करुन दाखवलं”; तानाजी सावंतांचे गर्विष्ठ वक्तव्य
कसब्यात टिळक कुटुंबीयांना उमेदवारी का दिली नाही? अखेर चंद्रकांत पाटलांनी सांगीतले खरे कारण

 

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now