मुंबई । सोनी टीव्हीवरचा सुप्रसिद्ध शो म्हणजे इंडियन आयडल. सध्या इंडियन आयडलचा बारावा सीजन सध्या सुरू असून रविवारी गायक किशोर कुमार स्पेशल एपिसोड प्रदर्शित केला गेला होता. मात्र याला एक वेगळेच गालबोट लागले होते.
या एपिसोडची शूटिंग देखील पूर्ण झाली होती. यामध्ये किशोर कुमार यांचा मुलगा गायक अमित कुमार हे देखील उपस्थित होते. परंतु त्यावेळी हा कार्यक्रम वादात सापडला होता. याचे कारण जरा वेगळे आहे जे ऐकून तुम्हालाही शॉक बसेल.
मला या एपिसोडमध्ये सगळ्यांचे कौतुक करायला सांगितले होते, असे अमित कुमार यांनी म्हटले होते. यामुळे हा शो आता चांगलाच वादात सापडला होता. गाणे कसेही गायले तरी कौतुक करायचे असे सांगितले गेले होते असा खुलासा अमित कुमार यांनी केला होता. तसेच मला हा एपिसोड बिलकुल आवडलेला नाही. हा एपिसोड थांबवावा असे मला वाटतंय, असेही ते म्हणाले होते.
सीजन 12 मध्ये किशोर कुमार यांना ट्रिब्यूट देण्यासाठी शंभर गाण्यांचा एपिसोड नुकताच प्रदर्शित केला गेलो होता. यामध्ये अमित कुमार यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्यात आले होते, शुटिंग संपताच अमित कुमार यांनी यावर प्रतिक्रिया दिली होती.
त्यांनी या एपिसोडचा अनुभव आपल्या शैलीत मांडला होता. यावेळी ते म्हणाले, मला या एपिसोडमध्ये सर्व स्पर्धकांचे कौतुक करण्यासाठी सांगितले होते सर्व स्पर्धकांचे प्रोत्साहन वाढवण्यासाठी हे करण्यासाठी सांगितले होते.
तसेच ते म्हणाले, मी या शो मध्ये गेलो कारण मी जी किंमत मागितली होती ती त्यांनी देण्याची तयारी दर्शवली, म्हणून मी या शोमध्ये गेलो होतो, असेही ते म्हणाले. तसेच कृपया यापुढे अशा पद्धतीने एपिसोड करू नका असेही अमित कुमार यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
हे त्या पुतीनला दाखवा, तिचे डोळे बघा; गोळीबारात ६ वर्षाच्या चिमुकलीची भयानक अवस्था, डॉक्टरही रडले
लग्न काही दिवसांवर आलेले असताना दोघेही गेले हॉटेलमध्ये, पुढे जे घडलं ते पाहून पोलिसही चक्रावले
‘राज्यपालांना माफी मागण्याची गरज काय?’ राज्यपालांच्या समर्थनार्थ रामदास आठवले मैदानात
गोड बातमी! शिवतीर्थावर लवकरच हलणार पाळणा, राज ठाकरे होणार आजोबा