Share

शेर शिवराज चित्रपटासाठी मनसे मैदानात, चित्रपटगृहांच्या मालकांना दिला ‘हा’ इशारा

छत्रपती शिवाजी महाराजांची अफजल खानाशी गळाभेट, अफजल खानाचा फसलेला कट आणि महाराजांनी वाघनखांनी केलेला अफजल खानाचा वध ही देशाच्या इतिहातील खुप मोठी घटना आहे. हीच घटना आता शेर शिवराज या चित्रपटाच्या माध्यमातून सांगण्यात आली आहे. (amey khopkar on sher shivraj)

शेर शिवराज हा चित्रपट दिग्पाल लांजेकर यांनी दिग्दर्शित केला आहे. सध्या या चित्रपटाची जोरदार चर्चा रंगली आहे. सध्या सगळीकडे हा शो हाऊसफुल्ल आहे. अशात आता या चित्रपटासाठी मनसे मैदानात उतरली आहे. शेर शिवराजला प्राईम टाईम देण्याची मागणी मनसेने केली आहे.

शेर शिवराज या चित्रपटाला मुंबईत प्राईम टाईम शो मिळत नसल्याची तक्रार दिग्पाल लांजेकर यांनी केली होती. याची गंभीर दखल आता मनसेने घेतली आहे. त्यामुळे शेर शिवराजला प्राईम टाईम देण्याची मागणी मनसेने चित्रपटगृहाच्या मालकांना केली आहे.

मनसेचे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी याबाबत ट्विट करुन माहिती दिली आहे. ‘शेर शिवराज’ चांगली गर्दी खेचत असूनही चित्रपटाला मुंबईत Prime Time शोज मिळत नाहीत. दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरांनी ही गोष्ट लक्षात आणून दिल्यावर मनसेतर्फे चित्रपटगृह मालकांना निवेदन देण्यात येत आहे. समाधानकारक प्रतिसाद मिळाला नाही तर मनसे स्टाईल आंदोलन करावंच लागेल, असे ट्विट अमेय खोपकर यांनी केले आहे.

https://twitter.com/MNSAmeyaKhopkar/status/1518809767216488448?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1518809767216488448%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.mumbailive.com%2Fmr%2Fmarathi-film%2Fmns-warns-theatre-owners-to-give-prime-time-show-to-sher-shivraj-cinema-in-mumbai-72931

दरम्यान, नुकतेच शेर शिवराज या चित्रपटाच्या कमाईचे आकडे समोर आले आहे. शुक्रवारी २२ एप्रिलला हा सिनेमा रिलीज झाला होता. यावेळी केजीएफ २ आणि जर्सीही रिलीज झालेला आहे. त्यामुळे शेर शिवराजसाठी एक आव्हान होतं. पण तरीही महाराष्ट्रातील ६० टक्के चित्रपटगृहात हा चित्रपट हाऊसफुल्ल आहे.

पहिल्याच दिवशी या चित्रपटाने कोट्यवधी रुपयांची कमाई केली आहे. ट्रेड ऍनलिस्ट तरण आदर्श यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. पहिल्याच दिवशी शेर शिवराजने १.५ कोटींचा गल्ला जमवला आहे. हा आकडा पाहता हा चित्रपट चांगली कमाई करेल, असे तरण आदर्शने म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-
चालू लोकलमधून तीन तरुणींनी लागोपाठ मारल्या उड्या अन्…; मुंबईतील भयानक व्हिडिओ आला समोर
तब्बल १८ दिवसांनी सदावर्तेंची तुरूंगातून सुटका, बाहेर येताच छाती बडवत केली मोठी घोषणा
रामनवमीच्या हिंसाचारानंतर लोकांनी स्वत:च घरं पाडायला केली सुरूवात, बुलडोझर घेऊन पोहोचले प्रशासन

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now