देशातच नाही जगभरात कोरोनाच्या संकटाने धुमाकूळ घातला होता. कोरोनच्या काळात अनेक सोईसुविधा सरकारकडून दिल्या जात होत्या. तसेच कोरोनावर उपाय म्हणून कोरोना प्रतिबंधक लसही दिल्या जात होत्या. ज्यामुळे लोकांना कोरोनापासून स्वत:चा बचाव करता येईल. (american says mr modi viral video)
कोरोना लस घेतल्यानंतर त्यासोबत एक सर्टिफिकेटही भेटत होते. त्या सर्टिफिकेटवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो दिला जात होता. असे असताना सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक माणूस मोदींना बघून हा माणूस रोज आमच्या बारमध्ये येतो असे म्हणताना दिसून येत आहे.
संबंधित व्हिडिओ हा न्युयॉर्कचा आहे. तिथे एक माणूस बारच्या बाहेर व्हॅक्सिनेशन सर्टिफिकेट बघण्यासाठी उभा होता. सर्टिफिकेट दाखवणे गरजेचे होते. त्यामुळे सर्वजण त्याला ते दाखवत होते. त्यावेळी एका भारतीयाने कोरोना व्हॅसिनेशनचे सर्टिफिकेट दाखवले. त्या माणसाने बघितले की यावर मोदींचा फोटो आहे. तो फोटो बघून तो हैराणच झाला.
बारच्या बाहेर उभा असणारा व्यक्ती म्हणाला, तुम्ही जे सर्टिफिकेट आणता त्याच्यावर तुमचा फोटो असायला हवा. मी पहिल्यांदा असे बघतोय की तुमच्या व्हॅक्सिनेशन सर्टिफिकेटवर दुसऱ्या कोणत्या व्यक्तीचा फोटो आहे. त्यावर भारतीय व्यक्ती म्हणते की हे आमचे पंतप्रधान आहे. त्यावर तो माणूस खुप हैराण होऊन जातो.
तो म्हणतो, तुमचे पंतप्रधान तुमच्या व्हॅक्सिनेशन सर्टिफिकेटवर काय करताय? हे तर असं आहे की आमच्या सर्टिफिकेटवर डोनाल्ड ट्रंपचा फोटो लावणे. या फोटोत जो व्यक्ती दिसत आहे तो आमचा सर्वात चांगला कस्टमर आहे. हा व्यक्ती आमच्या बारमध्ये रोज पाचवेळा येतो. मी कोणाचा अपमान नाही करत आहे आणि तुम्ही प्लिज हसू नका.
त्यानंतर बारच्या बाहेर उभा असलेला माणूस मोदींच्या फोटोकडे बघतो आणि म्हणतो की, तुम्हाला भेटून बरं वाटलं मिस्टर कोविड. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तसेच यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या जात आहे. हा व्हिडिओ सध्या सगळीकडे चर्चेचा विषय ठरला आहे.
महत्वाच्या बातम्या-
खसारीलालने मिठी मारताच ढसाढसा रडू लागली अभिनेत्री, वाचा शुटींगदरम्यान नक्की काय घडलं?
‘या’ कंपनीने शेअर मार्केटमध्ये घातला धुमाकूळ, १ लाखाचे केले ३ कोटी तेही फक्त ६ महिन्यात
फक्त रोज ३० रुपये वाचवा अन् करोडपती व्हा; बचतीची ‘ही’ भन्नाट आयडिया ऐकून हैराण व्हाल