Share

पुन्हा रंगणार महाराष्ट्र केसरीचा थरार, सिकंदर-महेंद्रचा वाद मिटवण्यासाठी पुन्हा होणार कुस्ती

sikandar shaikh

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा संपली असली तरी सध्या ती चर्चेचा विषय ठरली आहे. कारण या स्पर्धेच्या सेमी फायनलमध्ये पैलवान सिकंदर शेखचा पराभव झाला होता. यंदाच्या महाराष्ट्र केसरीचा सिकंदर शेख प्रबळ दावेदार मानला जात होता. पण त्याचा सेमी फायनलमध्ये पराभव झाला.

पंचांनी सिकंदर शेखच्या वेळी चुकीचा निर्णय घेतला असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. सिकंदर शेखवर अन्याय झाला आहे, असे अनेक कुस्ती तज्ञ म्हणत आहे. स्वत: सिकंदरने सुद्धा आपल्यावर अन्याय झाल्याचे म्हटले. सेमी फायनलमध्ये महेंद्र गायकवाडला चुकीच्या पद्धतीने गुण देण्यात आल्याचेही त्याने म्हटले होते.

अशात महाराष्ट्र केसरी कुस्तीच्या पंचांना धमकीचे फोनही आले होते. त्यामुळे हा वाद दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे. पण आता हा वाद थांबवण्यासाठी सांगलीतील अंबाबाई तालीम संस्थेने मार्ग शोधून काढला आहे. महेंद्र गायकवाड आणि सिकंदर शेख यांच्यात पुन्हा कुस्ती घेण्याचा निर्णय या संस्थेने घेतला आहे.

महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या माती गटातील लढत सिकंदर शेख आणि महेंद्र गायकवाड यांच्यात झाली होती. त्यावेळी महेंद्रने टांग डाव खेळला होता. पण तो पुर्णपणे बसलेला नसतानाही त्याला चार गुण दिले गेल्याचा आरोप सोशल मीडियावरुन केला जात आहे.

त्यानंतर मुंबई पोलिस दलातील संग्राम कांबळे यांनी पंच मारुती सातव यांना धमकी दिली होती. त्यामुळे त्यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे हा वाद वाढत असताना अंबाबाई तालीम संस्थेने वाद थांबवण्यासाठी मार्ग शोधून काढला आहे.

अंबाबाई तालीमीचे अध्यक्ष संजय भोकरे यांनी सिकंदर शेख आणि महेंद्र गायकवाड यांच्यात पुन्हा कुस्ती घेण्याची तयारी दर्शवली आहे. या दोघांमध्ये जो कुस्ती जिंकेल त्याला महाराष्ट्र केसरीच्या तोलामोलाची चांदीची गदा दिली जाणार आहे. तसेच महाराष्ट्र महाकेसरीचा खिताब  दिला जाणार आहे. सिकंदरने या निर्णयाला सहमती दर्शवली आहे. आता सर्वजण महेंद्र गायकवाडच्या प्रतिक्रियेची प्रतिक्षा करत आहे.

या स्पर्धेत पैलवान सिकंदर शेखचा पराभव झाला. परंतु नंतर हा निकाल अयोग्य असल्याच्या चर्चा होतांना दिसताय. पैलवान सिकंदर शेख याच्या पराभवाला आयोजकच जबाबदार आहेत असे मोहोळचे माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर यांनी आरोप केला आहे.

रमेश बारसकर हे सिकंदर शेखला आर्थिक तसेच खुरकासाठी मदत करतात. सिकंदर शेखवर अन्याय झाल्याच्या नेटकाऱ्यांच्या भावना आहेत.आता या अन्यायाबद्दल सिकंदर शेखच्या गावाचे माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

रमेश बारसकर यांनी गंभीर आरोप करत म्हटले आहे की, जेव्हाही पुण्यात महाराष्ट्र केसरी स्पर्धा होते त्या -त्या वेळी दुजाभाव केला जातो. पुण्यात स्पर्धा झाल्यानंतर केवळ पुण्यातीलच स्पर्धक कसे विजयी होतील अशा पद्धतीनेच निर्णय घेतले जातात.

महत्वाच्या बातम्या-
थाट असावा तर असा! सासूने जावयासाठी बनवले तब्बल १७३ पदार्थ, ४ दिवसांपासून करत होत्या तयारी
भाषेत शुद्ध अशुद्ध असं काही नसंत, भाषेचा हेतू शुद्ध ठरवणं नसून…; प्रमाण भाषेचा आग्रह धरणारांना नागराजने खडसावले
रतन टाटांनी २५ वर्षांपूर्वीचा फोटो केला शेअर; म्हणाले, माझ्या हृदयात तुझ्यासाठी आजही खास जागा…

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now