देशाच्या वाहन क्षेत्रात आता वेगाने बदल होताना दिसत आहे. अनेक नवनवीन कार बाजारात उपलब्ध होत आहे. त्यात अनेक फिचर्सही ऍड केले जात आहे. पण जसे जसे फिचर्स वाढत जातात तशी तशी कारची किंमत वाढत जाते. त्यामुळे सामान्य माणसाला ती कार परवडत नाही.
नव्वदच्या दशकामध्ये, टाटा मोटर्सने सामान्य माणसाला परवडणारी हॅचबॅक टाटा इंडिका लाँच केली होती. ही देशातील पहिली डिझेल कार म्हणून लॉन्च केली गेली होती. आता रतन टाटा पुन्हा एकदा त्या कारसोबत दिसून आले आहे.
रतन टाटा यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर सुमारे २५ वर्षांपूर्वी इंडिका कारसोबत घेतलेला फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत रतन टाटा यांनी एक भावनिक पोस्टही लिहिली आहे, जी खूप पसंत केली जात आहे.
२५ वर्षांपूर्वी टाटा इंडिकाच्या माध्यमातून भारतात स्वदेशी प्रवासी कार उद्योगाला सुरुवात झाली होती. या खुप आनंदाच्या आठवणी आहे. माझ्या हृदयात आजही तुझ्यासाठी खास जागा आहे, असे रतन टाटा यांनी इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले आहे.
या पोस्टमध्ये रतन टाटा यांनी आपला टाटा इंडिकासोबतचा एक फोटो देखील शेअर केला आहे. त्यामध्ये ते कारच्या बाजूला उभे असल्याचे दिसून येत आहे. सोशल मीडियावर ही पोस्ट खुप व्हायरल होत असून आतापर्यंत ४२ लाखांपेक्षा जास्त लोकांनी या फोटोला लाईक केले आहे.
दरम्यान, टाटा इंडिका १९९८ मध्ये लाँच करण्यात आली होती. डिझेल इंजिनवर चालणारी ही भारतातील पहिली कार होती. त्यावेळी या कारची किंमत २.६ लाख रुपये होती. त्यामुळे ही कार भारतातील सामान्य लोकांना परवडणारी कार होती.
महत्वाच्या बातम्या-
सिंकदरच्या कुस्तीचा निकाल देणाऱ्या पंचांना खरच दिली धमकी? अखेर सिकंदरने समोर आणले सत्य
निवडणूक आयोगाने काय त्यांच्या कानात…; सुषमा अंधारेंनी शिंदे गटाच्या आमदारांना झाप झाप झापले
वारसा असतानाही रितेश राजकारणात का नाही आला? अखेर रितेशने स्वतःच उघड केले खरे कारण