जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून टार्गेट किलिंगच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहे. काश्मिरी पंडितांना लक्ष्य करुन त्यांच्या हत्या केल्या जात आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेवरुन वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहे.
काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून हत्यासत्र सुरूच आहे. गुरुवारी कुलगाममध्ये दहशतवाद्यांनी एका बँक व्यवस्थापकाची हत्या केली. दहशतवाद्यांनी १ मेपासून काश्मीरमध्ये केलेली ही आठवी हत्या असून, या हत्यासत्राचे पडसाद उमटत आहेत. काश्मीरमध्ये सामान्य नागरिक तसेच काश्मीरी पंडीतांच्या हत्यांचेही सत्र काही केल्या थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत.
केंद्राने काश्मीरी पंडीतांच्या सुरक्षेचे अनेक दावे केले. मात्र, हत्यासत्र थांबलेले नाही. तर आता यावरून राजकारण देखील चांगलेच तापले आहे. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर तीव्र खदखद मांडली जात असताना केंद्री सरकारने नेमके काय प्रयत्न केले? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जातं आहे.
अशातच एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. काश्मिरातील तब्बल 1 हजार 800 पंडितांसह 3 हजारहून अधिक हिंदूंनी एकाच दिवसात काश्मीर सोडलं आहे. काश्मिरात होत असलेल्या टार्गेट किलिंगच्या भीतीने काश्मिर सोडण्याचा निर्णय बहुतांश हिंदू कुटुंबीयांनी घेतला आहे.
तर दुसरीकडे शुक्रवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीसाठी जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांना दिल्लीत बोलावण्यात आले होते. गुरुवारी दहशतवाद्यांनी बँक व्यवस्थापकासह दोघांची हत्या केल्यावर ही बैठक बोलावण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, काश्मीरमध्ये गेल्या २० दिवसांत आठ हत्या झाल्या आहेत. ज्यामध्ये काश्मिरी पंडित आणि स्थलांतरित हिंदूंचा समावेश आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यात टार्गेट किलिंगच्या माध्यमातून दहशतवाद्यांनी बिगर काश्मिरी आणि काश्मिरी पंडितांना लक्ष्य केले आहे. या हल्ल्यांबाबत मोदी सरकार आधीच विरोधकांच्या निशाण्यावर आहे.
महत्त्वाच्या बातम्या
भारताने मोठ्या मनाने चहाचे कंटेनर पाठवले पण त्यात व्हायरस आहेत म्हणत ‘या’ देशाने केले रिटर्न
सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी तरडेंच्या ‘सरसेनापती हंबीरराव’वर दिली प्रतिक्रिया; म्हणाले, या चित्रपटात…
गॅस सिलेंडरवरचे अनुदान झाले कायमचे बंद, आता फक्त ‘या’ लोकांना मिळणार २०० रुपये सूट
‘सत्ताधारी शहरातील कुत्र्यांची नसबंदी करण्यात व्यस्त आहेत’, अजित पवारांचा भाजपला टोला






