काल राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत ‘रालोआ’च्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मान्य करूनही अखेर शिवसेनेचे १२ खासदार शिंदे गटात दाखल झाले. शिवसेनेतील फूटनाटय़ाचा दुसरा अंक मंगळवारी दिल्लीत रंगला.
विशेष बाब म्हणजे, शिंदे गटाने लोकसभेतील गटनेतेपदी राहुल शेवाळे यांची नियुक्ती केली असून, त्यास लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी मान्यता दिल्याचे सांगण्यात आले. शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल खूप मोठा गौप्यस्फोट केला आहे.
शेवाळे यांनी उद्धव ठाकरे यांना देखील भाजपसोबत युती हवी आहे. त्यांनी सर्व खासदारांना तसं सांगितल्याचा मोठा दावा केला. भाजपासोबत युती करण्यासाठी उद्धव ठाकरे तयार होते. यासाठी दिल्लीत मोदींसोबत तासभर चर्चा देखील झाली होती, असा गौप्यस्फोट राहुल शेवाळे यांनी केला.
याबाबत ते दिल्लीत महाराष्ट्र सदनात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी बोलताना शेवाळे यांनी म्हंटलं आहे की, पंतप्रधान मोदींसोबत उद्धव ठाकरे यांची युतीवर तासभर बैठक झाली होती. आतापर्यंत युतीबाबत चारवेळा चर्चा झाली आहे. उद्धव ठाकरेंनाही ही युती हवी होती. मात्र त्यानंतर जुलैमध्ये राज्यात भाजपाच्या १२ आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती, असं शेवाळे यांनी म्हंटलं आहे.
पुढे बोलताना राहुल शेवाळे यांनी म्हंटलं आहे की, ‘भाजपाच्या १२ आमदारांचे निलंबन करण्यात आल्यानंतर भाजपाचे पक्ष श्रेष्ठी नाराज झाले होते. नाहीतर तेव्हाच युती झाली असती. या सर्व बाबींचा उल्लेख उद्धव ठाकरेंनी आमच्यासमोर केला आहे”, असा खळबळजनक गौप्यस्फोट शेवाळे यांनी केला.
दरम्यान, पुढे बोलताना शेवाळे यांनी सांगितलं आहे की, ‘उद्धव ठाकरेंनी आम्हाला बैठकीत सांगितलं होतं की, मी माझ्यापरिने युती करण्याचा प्रयत्न केला. आता तुम्ही देखील प्रयत्न करा. त्यानंतर मी चार-पाच खासदारांना घेऊन एकनाथ शिंदे यांना भेटलो. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना भेटलो, असा खुलासा शेवाळे यांनी केला.
महत्त्वाच्या बातम्या
हातातले शिवबंधन सरणावर गेल्यावरच सुटेल; पक्ष सोडतानाही शिवसेना नेत्याची भावूक प्रतिक्रिया
तुमच्या ‘या’ सवयींमुळे वयाच्या आधीच तुम्ही दिसू शकता म्हातारे; वाचा त्यावरील उपाय …
शाहरूख आणि काजोलबद्दल उडाली ‘ही’ अफवा, ऐकल्यावर अजय देवगणलाही लागेल मिर्ची
सोशल मीडियाचा वापर करत ‘या’ चार तरुणांनी उलथवून टाकली श्रीलंकेतील राजपक्षे कुटुंबाची सत्ता