Share

Manipur: नितीशकुमारांचे सगळे आमदार भाजपने फोडले; फक्त एकच आमदार पक्षात राहीला शिल्लक

nitish kumar kamal

मणिपूर(Manipur): बिहारमध्ये भाजपासोबतची युती तुटल्यानंतर मणिपूरमध्येही नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेडचे आमदार सरकारला असलेला पाठिंबा काढून घेणार असल्याची चर्चा होती. मात्र जेडीयू पक्षाच्याच ५ आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. एकीकडे जेडीयू इतर राज्यांमध्ये स्वतःला मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे.

अशातच जेडीयूच्या ५ आमदारांनी कमळ हाती घेतले आहे. यामुळे नितीश कुमारांना जोरदार धक्का बसला आहे. जेडीयूच्या महत्त्वपूर्ण बैठकीच्या एक दिवस आधी मणिपूरमधील पक्षाच्या आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मणिपूर विधानसभेचे सचिव मेघजीत सिंग यांनी जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, संविधानाच्या १० व्या अनुसूचीनुसार पाच आमदारांचे भाजपमध्ये विलीनीकरण सभापतींनी मान्य केले आहे.

या वर्षी मार्चमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत जेडीयूने ३८ जागांवर उमेदवार उभे केले होते. त्यापैकी ६ सीट निवडून आल्या. भाजपमध्ये सामील झालेल्या जेडीयू आमदारांमध्ये केएच जॉयकिशन, एन सनाते, मोहम्मद अछाबुद्दीन यांचा समावेश आहे. माजी पोलीस महासंचालक एएम खौटे आणि थंगजाम अरुणकुमार यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

खौटे आणि अरुणकुमार यांनी विधानसभा निवडणुकीत भाजपकडे तिकीटाची मागणी केली होती, मात्र यश न मिळाल्याने दोघांनी जेडीयूमध्ये प्रवेश केला होता. यावर्षी मार्च महिन्यात मणिपूर विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. ज्यामध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला. त्याचवेळी नितीश कुमार यांचा पक्ष जेडीयूनेही राज्यात ६ जागा मिळवल्या होत्या.

मात्र, आता जेडीयूचे ५ आमदार बाणांऐवजी कमळात सामील झाले आहेत. पाच आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून, त्याला सभापतींनीही मान्यता दिली आहे. जेडीयूचे प्रवक्ते आणि माजी मंत्री नीरज कुमार यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत आम्ही भाजपचा पराभव करू, असे ते म्हणाले.

भाजपने आपल्या मित्रपक्षांना दगा दिल्याचा इतिहास आहे. त्यांनी आधी अरुणाचल प्रदेशातील आमच्या सात आमदारांना पक्षांतर करण्यास प्रवृत्त केले आणि आता मणिपूरमधील पाच आमदारांना त्यांच्या पक्षात सामील करून घेतले. या निवडणुका आम्ही स्वबळावर जिंकल्या, असेही ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या
‘आमच्या कमळाला तुम्ही बाई म्हणत असाल तर आम्हीपण..,’ कमळाबाईवरून भाजपा संतापली
उद्धवसाहेबांनी सर्वधर्मीयांचे प्राण वाचवले, तुम्ही तर थाळ्या वाजवायला आणि दिले लावायला सांगितले
हिंदू-मुस्लीम ऐक्याचं प्रतीक! मुस्लीम कुटुंबाच्या घरात आरतीसोबतच नमाज पठणही; वाचा सविस्तर
‘गांधींना मारले ते बरं झालं, कारण…’; महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधींचे खळबळजनक विधान

राजकारण इतर ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now