Share

लग्न होऊनही आपल्या पतीपासून २७ वर्षे लांब राहिल्या होत्या अलका याज्ञिक, कारण वाचून अवाक व्हाल

बॉलिवूडच्या दिग्गज गायिका अलका याज्ञिक यांनी लहान वयातच संगीत क्षेत्रात आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये आतापर्यंत जवळपास १६ भाषांमध्ये २ हजारपेक्षा जास्त गाणी गायली आहेत. अलका त्यांच्या व्यावसायिक आयुष्यात खूप यशस्वी झाल्या. मात्र, हे यश मिळवण्यासाठी त्यांना अनेक गोष्टींचा त्यागही करावा लागला. यामध्ये मुख्यत्वे त्यांनी त्यांच्या करिअरसाठी पतीपासून तब्बल २७ वर्ष लांब राहिल्या.

अलका यांचा जन्म कोलकातामधील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांनी त्यांच्या आई शुभा याज्ञिक यांच्याकडून शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले. वयाच्या ६ व्या वर्षापासूनच अलका यांनी संगीत शिकण्यास सुरुवात केली. त्यानंतर अलका जेव्हा १४ वर्षांच्या होत्या तेव्हा त्यांनी बॉलिवूडमध्ये त्यांच्या करिअरची सुरुवात केली. त्यांनी पहिल्यांदा ‘पायल की झंकार’ या चित्रपटातील ‘थिरकर अंग लचक झुकी’ हे गाणं गायलं.

त्यानंतर १९८१ मध्ये ‘लावारिस’ चित्रपटात त्यांनी ‘मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है’ हे गाणं गायलं. हे गाणं हिट झालं असलं तरी त्यांना पुढे खूप मेहनत करावी लागली. त्यानंतर १९८८ साली आलेल्या ‘तेजाब’ या चित्रपटातील ‘एक दो तीन’ या गाण्यासाठी त्यांना फिल्मफेअरचा बेस्ट प्लेबॅक सिंगरचा अवॉर्ड मिळाला. या गाण्यानंतर अलका यांनी आतापर्यंत ७०० चित्रपटात २० हजारपेक्षा अधिक गाणी गायली आहेत.

https://www.instagram.com/p/CCqH2yXp5hw/

अलका यांनी १९८९ साली बिझनेसमॅन नीरज कपूर यांच्याशी लग्न केलं. पण लग्नानंतर अलका आणि त्यांचे पती २७ वर्ष एकमेकांपासून दूर राहिले. याचे कारण म्हणजे या दोघांचेही क्षेत्र वेगळे होते. नीरज त्यांच्या बिझनेसमुळे शिलाँगमध्ये राहायचे तर अलका मुंबईत राहायच्या. मात्र, दोघेही जसा वेळ मिळेल तसा एकमेकांना भेटायचे.

अलका आणि नीरज कामानिमित्त दोन वेगळ्या देशात राहत असले तरी अधूनमधून दोघांच्या भेटी व्हायच्या. यादरम्यान त्यांच्या मुलीचा जन्म झाला. मुलीच्या जन्मानंतर नीरज यांनी मुंबईत शिफ्ट होण्याचा प्रयत्न केला. पण बिझनेसमध्ये तोटा झाल्याने ते पुन्हा शिलाँगला परतले. त्यानंतर पुन्हा अलका आणि नीरज वेगळे राहू लागले. पण त्या दोघांत चांगली बॉन्डिंग आणि प्रेम आहे.

https://www.instagram.com/p/CIifVq9JpOl/

 

 

 

अलका यांनी बॉलिवूडमध्ये अनेक सुपरहिट गाणी गायली आहेत. यामध्ये ‘टिप टिप बरसा पानी’, ‘मैय्या यशोदा’, ‘चुरा के दिल मेरा’, ‘परदेसी परदेसी’, ‘अगर तुम साथ हो’, ‘दिल लगा लिया’, ‘तुझे याद न मेरी आयी’, ‘कुछ कुछ होता है’, ‘ऐ मेरे हमसफर’ यासारख्या अनेक गाण्यांचा समावेश आहे. अलका यांना त्यांच्या गायनासाठी ७ वेळा फिल्मफेअर आणि दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या : 

सेटवर फोन उचलल्याने दिग्दर्शकाने मारलं; प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने केला धक्कादायक खुलासा

‘मांजरेकर हे मराठी चित्रपटसृष्टीचे आधारस्तंभ, जे काही बोलायचं असेल ते चित्रपट बघून ठरवा’

‘सिनेमा झाला आणि ही पोरगी आपली एकदम झक्कास मैत्रीण झाली’, विजू मानेंची पोस्ट चर्चेत

बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now