alka kubal share post about daughter new car | चाहते आपल्या आवडत्या अभिनेता आणि अभिनेत्रीवर बारीक लक्ष ठेवून असतात. त्यांच्या व्यवसायिक आणि खाजगी आयुष्यात काय सुरु आहे हे जाणून घेण्यासाठी चाहते खुप उत्सुक असतात. तसेच अनेक अभिनेत्री सुद्धा सोशल मीडियावर त्यांच्या खाजगी गोष्टी शेअर करत असतात.
आता प्रसिद्ध मराठी अभिनेत्री अलका कुबल यांनी त्यांच्या मुलीचा फोटो शेअर केला आहे. माहेरची साडी, लेक चालली सासरला, वहिनीची माया, अशा अनेक चित्रपटांमुळे अलका कुबल या घराघरांत पोहचल्या आहे. त्या त्यांच्या नम्रपणामुळे आणि साधेपणामुळेही ओळखल्या जातात.
अलका कुबल यांनी खुप कमी वेळात लाखो प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. त्या सोशल मीडियावरही खुप सक्रीय असतात. आता त्यांनी त्यांच्या मुलीबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. जी सोशल मीडियावर खुप व्हायरल होत आहे. त्यांच्या मुलीला त्यांनी उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहे.
अलका कुबल आणि त्यांचे पती समीर आठल्य यांना दोन मुली आहे. त्यामधल्या एका मुलीचे नाव ईशानी आहे, तर दुसऱ्या मुलाची नाव कस्तुरी आहे. या दोन्ही फिल्म इंडस्ट्री सोडून वेगळ्या क्षेत्रात काम करत आहे. त्यांची मोठी मुलगी ईशानी ही पायलट आहे. काही महिन्यांपूर्वी तिचे लग्न सुद्धा झाले होते.
लग्नांतरही ती तिच्या आयुष्यात उंच उंच शिखरे गाठताना दिसून येत आहे. ईशानीने नुकतीच तिची पहिली कार विकत घेतली आहे. स्वत: अलका कुबल यांनी याचा फोटो पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी इंस्टाग्रामवर ही पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये त्यांनी मुलीसाठी एक खास कॅप्शनही दिले आहे.
कॅप्शनमध्ये अलका कुबल यांनी म्हटले आहे की, आज दसऱ्याच्या दिवशी माझ्या मुलीने तिची पहिली गाडी विकत घेतली आहे. दोघांना खुप खुप शुभेच्छा आणि तुम्हा सर्वांना पण दसऱ्याच्या खुप खुप शुभेच्छा. अलका कुबल यांनी दोन फोटो पोस्ट केले आहे. त्यामध्ये एका फोटोत ते फॅमिलीसोबत आहे, तर दुसऱ्या फोटोमध्ये त्यांची मुलगी गाडीसोबत आहे.
महत्वाच्या बातम्या-
uddhav thackeray : आणखी एक ठाकरे येणार राजकारणात, बाळासाहेबांच्या मोठा नातू म्हणतो बापाचं देणघेणं नाही, उद्धवकाकांनी संधी….
Ganesh Sapkal : धक्कादायक! एकनाथ शिंदेंच्या दसऱ्या मेळाव्याला गेलेली व्यक्ती गायब; आता कुटुंबीय म्हणतात..
shivsena : शिवसेनेचा भाजपला दे धक्का! विदर्भातील बडा भाजप नेता करणार शिवसेनेत प्रवेश