आलिया भट्ट आता रणबीर कपूरची पत्नी आणि कपूर कुटुंबाची सून बनली आहे. आलियाने 14 एप्रिल रोजी रणबीरसोबत सात फेरे घेतले. लग्नानंतरच्या या गोंडस जोडप्याचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सहसा, जिथे वधू तिच्या लग्नासाठी महागडा चमकदार लेहंगा निवडते तिथे आलियाने अगदी साध्या पद्धतीने लग्न केले.
तिच्या अनोख्या कलिऱ्यांमध्ये आणि मोठ्या हिऱ्याच्या अंगठीची बरीच चर्चा आहे. तसेच तिचे मंगळसुत्रही चर्चेचा विषय ठरत आहे. आलियाने तिच्या गळ्यात एक अतिशय सुरेख मंगळसूत्र घातले होते, ज्याच्या डिझाइनचा तिचा जीवनसाथी रणबीर कपूरशी विशेष संबंध आहे. वास्तविक, आलियाच्या या मंगळसूत्रात अनंततेचे चिन्ह होते, जे सरळ पाहिल्यास ते 8 नंबरसारखे दिसते.
हा रणबीरचा लकी नंबर आहे. रणबीर नंबर 8 बद्दल किती सकारात्मक आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे. रणबीरच्या 8 नंबरवरील प्रेमामुळे आलियानेही या नंबरला आपला लकी चार्म मानण्यास सुरुवात केली आहे. सोनसाखळीसह मंगळसूत्रात फक्त एक मोती लटकलेला दिसत होता.
आलियाने अनेक प्रसंगी रणबीरवरील तिचे प्रेम या क्रमांक 8 द्वारे ओळखले आहे. कधी ती ८ नंबरची जर्सी घातलेली दिसली तर कधी तिच्या मोबाईलच्या कव्हरवर ८ नंबर असल्याचे आपण पाहिले आहे. इतकंच नाही तर 13 एप्रिलला झालेल्या मेहंदी सेरेमनीमध्ये आलियाने तिच्या मेहंदीमध्ये 8 नंबर लिहिलेला आणि रणबीरच्या नावाचे R हे अक्षरही लिहीलं होतं.
मेहंदी चेंबूर येथील रहिवासी असलेल्या मेहंदी कलाकार ज्योती छेडा यांनी काढली होती. आलिया आणि रणबीरच्या लग्नाला फक्त कुटुंबातील सदस्य आणि जवळचे मित्र उपस्थित होते. या लग्नात रणबीरचे बॉलिवूडमधील मित्र करण जोहर आणि अयान मुखर्जी सहभागी झाले होते. सात फेरे घेतल्यानंतर आलिया आणि रणबीर मीडियाला भेटले.
त्याने भरपूर पोझ तर दिल्याच सोबत डान्सही केला. नंतर रणबीरने आलियाला आपल्या हातांनी उचलून आरके हाऊसमध्ये नेले. आलिया आणि रणबीर त्यांच्या रिसेप्शनची पार्टी ठेवणार नाहीत अशी माहिती स्वता रणबीरच्या आईने दिली आहे. ते हनिमूनलाही जाणार नाहीत असंही बोललं जात आहे पण मिळालेल्या माहितीनुसार ते पुढच्या महिन्यात हनीमूनला जाऊ शकतात.
महत्वाच्या बातम्या
ना साडी, ना लेहंगा, लग्नानंतर पुर्णपणे बदलली आलिया भट्ट, व्हिडीओ पाहून चाहत्यांनाही बसेना विश्वास
हार्दिक रॉक्स! रॉकेटच्या वेगाने बॉल फेकून संजूला केलं आऊट, स्टंपचे झाले तुकडे, थांबवावा लागला सामना, पहा व्हिडीओ
काय सांगता? पेट्रोल आणि डिझेलच्या भावामुळे वाढल्या लिंबाच्या किंमती, कारण वाचून चक्रावून जाल
आरोग्य मंत्रालयाकडून झाली मोठी चुक, कोव्हिड लिंकऐवजी ट्विट केली पॉर्न लिंक