प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्ट ही नेहमीच चर्चेत असते. काहीच महिन्यांपूर्वी तिने अभिनेता रणबीर कपूरशी लग्न केले होते. त्यानंतर आता ती आई होणार आहे. काही दिवसांपूर्वी तिने इंस्टाग्रामवर सोनोग्राफीचा फोटो शेअर करत आपल्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली होती. (alia bhatt talk about first kiss)
१४ एप्रिलला आलियाने रणबीरशी लग्न केलं होतं. त्यानंतर आता लगेगच ती आई होणार आहे, त्यामुळे तिचे चाहते सुद्धा खुश आहे. ती २५ वर्षांची असतानाच तिने मुलांबद्दल विचार केला होता. २०१८ मध्ये फिल्मफेअरला तिने एक मुलाखत दिली होती. त्यावेळी तिने लग्नानंतरचे जीवन आपल्याला कसे हवे हे सांगितले होते.
मला लग्नानंतर दोन मुलं हवी आहे, असे आलियाने त्या मुलाखतीत म्हटले होते. इतकंच नाही, तर तिने आपल्या मुलांची नावं देखील ठरवली होती. तसेच याच मुलाखतीत आलियाने आपल्या आयुष्यातील पहिल्या किसबद्दलही खुलासा कला होता. तिने वयाच्या १७ व्या वर्षी पहिला किस केला होता.
रणबीर लग्नाआधी अनेकांसोबत रिलेशनशिपमध्ये होता. दीपिका, कतरिना यांच्यासोबतचे त्याचे नाते तर जगजाहीर झाले होते. तसेच आलिया सुद्धा अनेकांसोबत रिलेशनशिपमध्ये होती. पण लहानपणापासून तिचा क्रश रणबीर कपूर होता. त्यामुळे तिला त्याच्यासोबतच लग्न करायचं होतं
आलिया स्वत:ला खुप भाग्यवान समजते कारण तिला आयुष्यात जे हवं होतं ते तिला मिळालं. तिने खुप कमी वेळात बॉलिवूडमध्ये आपली एक वेगळी ओळख बनवली आहे. तिने स्टुडंट ऑफ द ईयर या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.
गंगुबाई काठियावाडी, हायवे, राझी, उडता पंजाब यांसारख्या चित्रपटात तिने गंभीर पात्रांच्या भूमिका साकारल्या होत्या. सध्या ती ब्रम्हास्त्रमुळे चर्चेत आली आहे. या चित्रपटात ती रणबीर कपूरसोबत दिसून येणार आहे. तसेच रॉकी और राणी की प्रेम कहानी’मध्ये ती महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
रस्ता पार करत असताना अचानक वाढली पाण्याची पातळी, पाण्याने ओढलं आत अन्…; पहा भयानक व्हिडिओ
अथिया शेट्टी आणि केएल राहूल लवकरच करणार लग्न? सुनील शेट्टी म्हणाला…
सारा अली खानसोबत गोवा ट्रिपला गेल्यानंतर काय काय झालं? जान्हवी कपूरने उघड केले रहस्य