अंडरवर्ल्ड डॉन अली बुदेश याचा बहारीनमध्ये मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तो एकेकाळी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या खूप जवळचा होता, पण नंतर त्याचा शत्रू बनला. त्याने दाऊदला मारण्याची शपथ घेतली होती. अली बुदेश हा मुंबईचा रहिवासी होता. (ali budesh death)
भारतातून फरार झाल्यानंतर त्याने बहारीनमध्ये तळ ठोकला होता. बुदेशचा मृत्यू आजाराने झाल्याचे निष्पन्न झाले आहे. दाऊदशी शत्रुत्व असलेल्या काही गुंडांपैकी अली बुदेश एक होता. त्याच्याशिवाय छोटा राजन आणि बबलू श्रीवास्तव हे देखील दाऊदच्या जीवाचे शत्रू होते.
गेल्या वर्षी पाकिस्तानात लपून बसलेल्या दाऊद इब्राहिम आणि छोटा शकीलने मुंबईतील गँगस्टर जान मोहम्मद याला अली बुदेशला मारण्यासाठी बहारीनला पाठवले होते, पण तो अयशस्वी ठरला होता. सुरक्षा यंत्रणांच्या सांगण्यावरून अली बुदेशने राजन आणि श्रीवास्तव यांच्या टोळीसोबत मिळून अनेक जवळच्या मित्रांचा जीव घेतल्यामुळे त्याचा जीव वाचला.
२०१८ मध्ये उत्तर प्रदेशच्या भाजप आमदारांकडून खंडणी मागितल्याप्रकरणी अली बुदेशचे नाव समोर आले होते. यानंतर तो म्हणाला की, दाऊद इब्राहिम त्याच्या नावाचा वापर करत आहे. उत्तर प्रदेशातील सुमारे २५ भाजप आमदारांकडून खंडणी मागितल्याप्रकरणी बुदेशचे नाव समोर आले होते.
तेव्हा बुदेशने एका वृत्तवाहिनीला सांगितले की, मी कोणत्याही आमदाराकडून खंडणी मागितली नाही. माझ्या नावावर भारतात खंडणी मागितली जात असल्याचे मला समजले आहे. यूपीसह दिल्ली आणि मुंबईत माझ्या नावाने धमकीचे मेसेज पाठवले जात आहेत. पण मी हे करत नाहीये.
धमकीचे मेसेज आणि खंडणी सर्व दाऊद इब्राहिमच्या इशार्यावर छोटा शकील करत असल्याचे बुदेशने म्हटले होते. त्यानंतर यूपीचे एडीजी आनंद कुमार यांनी सांगितले होते की, ज्या क्रमांकावरून धमकीचे संदेश येत आहेत ते दाऊदच्या एका साथीदार अली बुदेशच्या नावावर आहेत. हे टेक्सास, यूएसए येथून पाठवले जात आहे.
बुदेश यापूर्वी मुंबईत खंडणी मागण्याचे रॅकेट चालवत होता. त्याने ९० च्या दशकात फिल्म इंडस्ट्रीतील काही लोकांना धमकावले होते. १९९८ मध्ये दाऊदसोबत झालेल्या भांडणानंतर दोघे एकमेकांचे शत्रू झाले. २०१० मध्ये काठमांडूमध्ये दाऊद इब्राहिमच्या तीन साथीदारांची हत्या करण्यात आली होती. त्या घटनेत अली बुदेशचे नाव पुढे आले होते.
महत्वाच्या बातम्या-
‘Indian Idol Marathi’ला मिळाले टॉप 5 स्पर्धक, ‘या’ दिवशी होणार विजेतेपदासाठी लढत, प्रेक्षक उत्सुक
शेतकऱ्याचा नादखुळा प्रयोग! गुरांना उष्माघातापासून वाचवण्यासाठी छतावर बसवलं ‘हे’ उपकरण, लोकांनी केलं कौतुक
आमच्याकडून मिरवणूक निघत असताना जर त्यावर दगडफेक होणार असेल तर.., राज ठाकरेंचा इशारा