काही अभिनेत्रींनी आपल्या सौंदर्याने देशभरात एक वेगळा चाहता वर्ग निर्माण केला आहे. त्यातलेच एक नाव पूजा बेदी. आपल्या बोल्डनेसमुळे पूजा बेदी आणि बोल्ड भूमिकांमुळे पूजा बेदी नेहमीच चर्चेत असायची. तसेच तिने आपल्या सौंदर्याने सगळ्यांनाच घायाळ केलं होतं. (alaya furniture bold photo viral)
पूजा बेदीनंतर आता बोल्डनेसमुळे तिची मुलगी चर्चेत आली आहे. पूजा बेदीच्या मुलीचं नाव अलाया फर्निचरवाला असे आहे. अवघ्या २५ वर्षाच्या वयातच ती बोल्डनेसमुळे चर्चेत आली आहे. तिचे अनेक बोल्ड फोटो आणि व्हिडिओ हे सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
आतापर्यंत तिने जास्त चित्रपट केले नाहीये. पण तरीही सोशल मीडियावर तिची फॅन फॉलोविंग जास्त आहे. तिच्या बोल्ड फोटोंमुळे ती सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. १९९४ मध्ये पूजा बेदीनं इब्राहिम फर्निचरवालाशी लग्न केलं होतं. पण ते नातं जास्त काळ टिकू शकलं नव्हतं.
पूजा बेदी आणि इब्राहिम फर्निचरवाला यांना दोन मुलंही झाली. त्यातलीच एक अलाया फर्निचरवाला आहे. अलाया सर्वात जास्त चर्चेत त्यावेळी आली होती, जेव्हा ती बाळासाहेब ठाकरे यांचा नातू ऐश्वर्य ठाकरे याच्यासोबत दिसली होती. मिळालेल्या माहितीनुसार ऐश्वर्य ठाकरे आणि अलाया हे दोघेही चांगले मित्र आहे.
तसेच ऐश्वर्य आणि अलाया यांच्या नात्याबद्दल वेगवेगळ्या चर्चाही रंगल्या होत्या. पण त्यानंतर अलायाने त्या गोष्टींवर भाष्य करत चर्चांना पुर्णविराम लावला होता. तिने ऐश्वर्यबाबत बोलताना आपली त्याच्यासोबत कौटूंबिक मैत्री असल्याचे सांगितले होते. त्यामुळे ते फक्त मैत्रिच्या नात्यात असल्याचे स्पष्ट झाले होते.
दरम्यान, बाळासाहेब ठाकरेंचे नातू आदित्य ठाकरे यांचे नाव प्रसिद्ध अभिनेत्री दिशा पटानी बरोबर जुळले गेले होते. त्यांच्या नात्याच्याही चर्चा होत होत्या. असे असताना आता अलाया आणि ऐश्वर्य यांच्या नात्याबद्दल चर्चा सुरु आहे. त्यामुळे ठाकरेंची आणखी एक बोल्ड मैत्रीण चर्चेत आली आहे.
महत्वाच्या बातम्या-
“तुमच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू आहे, पण अमित ठाकरे मात्र सुरक्षित आहेत, कुठे लपले आहेत ते?”
“काय झालं, कसं झालं, कुठे झालं? सगळं सांगते…, दुसऱ्या लग्नाबाबत सोनाली कुलकर्णीचा खुलासा
“दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीप्रमाणे मराठी चित्रपटसृष्टीत एकी नाही”, प्रसाद ओकने व्यक्त केली खंत