महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्याविरोधात आक्रमक भूमिका घेतलेली आहे. मशिदींवरील भोंगे लवकरात लवकर खाली उतरवावे, अशी मागणी राज ठाकरेंनी केली आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी राज ठाकरेंनी जी सभा घेतली होती. त्या सभेत राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंग्यांबाबत आक्रमक भूमिका घेतली होती. (alahabad highcourt on loudspeaker)
राज ठाकरेंच्या या भूमिकेनंतर याचे पडसाद राज्यातच नाही, तर देशभरात पसरले आहे. वेगवेगळ्या राज्यातील नेत्यांनीही मशिदींवरील भोंग्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. तसेच उत्तर प्रदेश सरकारनेही भोंग्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी भोंगे खाली उतरवण्याचे आदेशही दिले होते. आता अलाहाबाद उच्च न्यायालयाने यावर मोठा निर्णय दिला आहे,
मशिदी आणि इतर धार्मिक स्थळांवरून लाऊडस्पीकर हटवण्याच्या योगी सरकारच्या निर्णयाला अलाहाबाद उच्च न्यायालयानेही मंजुरी दिली आहे. मशिदीत लाऊडस्पीकर लावण्याची परवानगी मागणारी याचिका फेटाळताना न्यायालयाने म्हटले की, मशिदीत लाऊडस्पीकर लावणे हा कोणाचाही मूलभूत अधिकार नाही.
हायकोर्टाने शुक्रवारी बदायूं येथील नूरी मशिदीतील मौलवींची लाऊडस्पीकर लावण्याची परवानगी मागणारी याचिका फेटाळून लावली. मशिदीवर लाऊडस्पीकर लावून अजान देणे हा कोणाचाही मूलभूत अधिकार नाही, असे अलाहाबाद उच्च न्यायालयाने म्हटले आहे.
बदायूंच्या नूरी मशिदीचे मौलवी इरफान यांच्यावतीने करण्यात आलेली याचिका न्यायमूर्ती विवेक कुमार बिर्ला आणि न्यायमूर्ती विकास बधवार यांच्या खंडपीठाने फेटाळून लावली आहे. इरफान यांनी अजानसाठी लाऊडस्पीकर लावण्याची परवानगी मागत एसडीएम तहसील बिसौलीकडे अर्ज केला होता. पण एसडीएमने तो फेटाळल्याने ते उच्च न्यायालयात गेले होते.
सरकार आणि प्रशासनाला मशिदींमध्ये लाऊडस्पीकर लावण्याचे अथवा माईक लावण्याची परवानगी देण्याचे निर्देश देण्यात यावे, अशी मागणी इरफान यांनी न्यायालयाकडे केली होती. एवढेच नाही, तर एसडीएमचा निर्णय बेकायदेशीर असून आपल्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करणारा आहे, असा युक्तिवादही त्यांनी केला होता. यावर इरफान यांची याचिका फेटाळून लावत, मशिदींवर लाऊडस्पीकरचा वापर हा मूलभूत अधिकार नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
वडिलांवर लावलेल्या आरोपांनंतर संतापला शत्रुघ्न सिन्हांचा मुलगा; म्हणाला, अशा फालतू गोष्टींवर…
राज ठाकरेंना धमकी का दिली? युपीतील भाजपा खासदाराने स्पष्टच सांगितलं; “शिवाजी महाराजांच्या…
नवी मुंबईत आगीचे तांडव! तब्बल नऊ कंपन्या जळून खाक