तुझ्यात जीव रंगला मालिकेतील पाठकबाई म्हणजेच अक्षया देवधर आणि राणा दा म्हणजेच हार्दिक जोशी सध्या चांगलेच चर्चेत आहे. ऑनस्क्रीन नवरा-बायकोचे नाते निभावणाऱ्या दोघांनीही ३ मे ला साखरपुडा केला होता. अचानक झालेल्या या सर्व गोष्टींमुळे त्यांचे चाहतेही खुश झाले होते. (akshya deodhar ukhana for hardik)
अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. अक्षयाने तुझ्यात जीव रंगला मालिकेत पाठकबाईचे पात्र इतके चांगले साकारले होते की तिने घराघरात एक वेगळी ओळख निर्माण केली. तर हार्दिक जोशीनेही आपला एक चाहता वर्ग तयार केला आहे.
अक्षया ही सोशल मीडियावर खुप सक्रीय असते. ती हार्दिकसोबतचे अनेक फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत आहे. आता तिने होणाऱ्या नवऱ्यासाठी एक उखाणा घेतला आहे. तिच्या उखाण्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खुप व्हायरल होत आहे.
अक्षया देवधर नुकतीच एका कौटुंबिक कार्यक्रमात सामील झाली होती. तिथे तिने हार्दिकसाठी उखाणा घातला आहे. फुलावर फिरत असतो भुंगा त्याला हिंदीत म्हणतात भवरा, हार्दिक रावांचं नाव घेते कारण तो आहे माझा होणारा नवरा, असा उखाणा तिने घेतला आहे.
या व्हिडिओमध्ये अक्षयाने पांढऱ्या रंगाचे स्लिवलेस ब्लाऊज घातले आहे. तर जांभळ्या रंगाची साडी नेसलेली आहे. या व्हिडिओमध्ये अक्षया खुपच सुंदर दिसत आहे. आतापर्यंत या व्हिडिओला ३४ हजारांपेक्षा जास्त लोकांनी लाईक केले आहे. तर अनेकांनी कमेंटही केल्या आहे.
अक्षया आणि हार्दिक लवकरच लग्न करणार आहे. पुण्यात या दोघांचा विवाह सोहळा पार पडणार आहे. ते दोघेही चला हवा येऊ द्या या शोमध्ये आले होते. तिथे त्यांनी आपण लवकरच लग्न करणार असल्याचे जाहीर केले होते. तसेच लग्नाच्या तारीखबाबत अजूनही त्यांनी खुलासा केलेला नाही.
महत्वाच्या बातम्या-
एकनाथ शिंदे आक्रमक! आता थेट ठाकरे घरावरच केला तुफान हल्लाबोल
उद्धव ठाकरेंच्या पाठीत त्यांच्याच लोकांनी खंजीर खुपसला; मोदींचा हनुमान’ उद्धव ठाकरेंसाठी धावला
साऊथच्या सर्वात महागड्या अभिनेत्रीच्या पतीचे अचानक निधन, ‘या’ गंभीर आजाराने होते त्रस्त