Share

राणादा आणि पाठकबाईंचं अखेर खऱ्या आयुष्यातही ठरलं! पहा साखरपुड्याचे सुंदर फोटो अन् व्हिडीओ

‘तुझ्यात जीव रंगला’ या मराठी मालिकेतील लोकप्रीय अभिनेत्री अक्षया देवधर (Akshaya Deodhar) आणि त्याच मालिकेतील अभिनेता हार्दिक जोशी (Hardik Joshi) यांनी चाहत्यांना आश्चर्याचा जोरदार धक्का दिला आहे. त्यांचा मंगळवारी (ता. ३) साखरपुडा पार पडला. राणादा आणि पाठकबाईंच्या या बातमीने मनोरंजन विश्वात खळबळ उडाली आहे.

‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतल्यानंतरही ते दोघे नेहमीच चर्चेत असायचे. अचानक त्यांच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे.

राणादा आणि अंजली या नावाच्या पात्रांनी प्रेक्षकांवर गारूड केले होते. हार्दिक आणि अक्षयाची जोडी प्रत्येक प्रेक्षकाला पसंत होती. ते लोकांच्या हृदयावर अक्षरश राज्य करीत होते. त्यांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले होते. अक्षयाच्या विविध स्टायलिश फोटोंनी सोशल मीडियावर हवा केली होती. ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेमुळे अक्षया आणि हार्दिक घराघरांत पोहोचले होते.

अक्षया आणि हार्दिक यांनी त्यांच्या साखरपुड्याचे काही फोटो सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ते खूपच सुंदर दिसत आहेत. त्यांच्या फोटोंना चाहत्यांनीही पसंद केले आहे. ती पोस्ट सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे. हार्दिकने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून साखरपुड्याचा व्हिडिओ देखील शेअर केला आहे. त्यांच्या व्हिडिओवर चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहे.

यापुर्वीही दोघांचे स्टायलीश फोटो सोशल मिडीयावर शेअर व्हायचे. त्या फोटोंनाही चाहत्यांचा तुफान प्रतिसाद असायचा. आता पुन्हा एकदा या दोघांची सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे. या चर्चेला कारणही तितकंच खास आहे.

कारण, दोघांचा आज साखरपुडा पार पडला आहे. हा त्यांच्या आयुष्यातील अतिशय महत्वाचा क्षण आहे. फोटोवर अहा फायनली जमलं अशा शब्दांत कॅप्शन दिले आहे. यातून तिला झालेला आनंद दिसून येतो

हार्दिकने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून साखरपुड्याचा व्हिडिओ देखील शेअर केला आहे. त्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की अक्षया ही हार्दिकच्या मांडीवर बसली आहे आणि ती हार्दीकला रिंग घालताना पाहायला मिळत आहे. दोघेही खळखळून हसत आहेत.

त्यांचे सुख त्यांच्या चेहऱ्यावर झळकत आहे. लोकप्रीय मालिकेत नवरा बायकोची भूमिका साकारलेली ही जोडी आज खऱ्या आयुष्यातही प्रत्यक्षात उतरली आहे. त्यांच्यावर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

महत्वाच्या बातम्या
‘एक तो हम रहेंगे, नही तो तूम रहोगे XX…’; भडकलेल्या बच्चू कडूंची जाहीर धमकी
तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचं ऐकणार की बेगडी शरद पवारांचं? राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल
आता नाही तर कधीच नाही! उद्याच्या आंदोलनासाठी राज ठाकरेंनी देशातील हिंदूंना दिला ‘हा’ आदेश
पृथ्वी शॉ ने मुंबईत खरेदी केले तब्बल ‘एवढ्या’ कोटींचे अपार्टमेंट, वाचा असं काय खास आहे त्यात?

ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now