देशाचे तुकडे करणं थांबवा, हे काम तर…; अक्षय कुमारने साऊथ इंडस्ट्रीबद्दल केले मोठे वक्तव्य

बॉलिवूडचा खिलाडी कुमार सध्या त्याचा आगामी चित्रपट पृथ्वीराजमुळे चांगलाच चर्चेत आहे. अक्षय या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार आहे. अभिनेत्री मानुषी छिल्लर त्याच्यासोबत दिसून येत आहे. तो सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. (akshay kumar on south industry)

अशात अक्षय कुमार पृथ्वीराजच्या प्रमोशनसाठी आला होता. यावेळी पत्रकारांनी त्याच्याशी संवाद साधला होता. तसेच अनेक पत्रकारांनी त्याच्याशी बोलताना वेगवेगळे प्रश्न विचारले. त्यानेही दिलखुलासपणे उत्तर दिली आहे. त्याने वेगवेगळ्या मुद्यांवर भाष्यही केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड विरुद्ध साऊथ इंडस्ट्री असा वाद सुरु आहे. दक्षिणात्य अभिनेता किच्चा सुदीप याने हिंदी भाषेसंदर्भात एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर अभिनेता अजय देवगणने त्याला सुनावले होते. याच मुद्यावरुन पुन्हा वाद पेटला होता.

अक्षय कुमारला या वादाबद्दल विचारण्यात आले होते. तर त्याने यावर उत्तर दिले आहे. मी आज या मुद्यावर आपलं मत व्यक्त करतोच. तुम्ही आधी साऊथ इंडिया, नॉर्थ इंडिया असं बोलत असाल तर ते का बोलत आहात याचा आधी विचार करायला हवा. ते काय म्हणतात याच्याशी मला काही घेणं देणं नाही, असे अक्षय कुमारने म्हटले आहे.

मला वैयक्तिकरित्या असं वाटतं की एकच इंडियन फिल्म इंडस्ट्री आहे. दक्षिणात्य सिनेमा चालावेत आणि आपलेही सिनेमे चालावेत असे मला वाटते. आज जे होत आहे ते स्वातंत्र्य लढ्याच्या काळातही होत होते. तुकडे पाडण्याचं काम ब्रिटीशांनी केलं होतं. त्यांनी भारताची नॉर्थ, साऊथ आणि इस्ट इंडिया अशी विभागणी केली होती, असे अक्षय कुमारने म्हटले आहे.

तसेच कोण काय म्हणतंय याचा मला फरक पडत नाही. पण माझा विचार काय आहे आणि त्यावर माझी प्रतिक्रिया काय असायला हवी हे मला सांगणं महत्वाचं वाटतं. आपण देशासाठी काय करु शकतो, काय देऊ शकतो, याचा आपण विचार करायला हवा, असेही अक्षय कुमारने म्हटले आहे.

तसेच एक काळ असा होता की १५ लाखांमध्ये सिनेमा बनायचा. आता त्याचं बजेट २४० ते २५० कोटींपर्यंत गेलं आहे. यात दक्षिणात्य सिनेमाचा जेवढा वाटा आहे, तितकाच वाटा आपलाही आहे. त्यामुळे दोघांमध्ये फुट पाडण्याची चर्चा सुरु आहे ती बंद करा. इंडस्ट्रीचे तुकडे पाडणं बंद करा. यामागे नक्की कोणाचा तरी हात आहे, त्यापासून आपण सावध राहायला हवं, असेही अक्षयने म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-
हल्मेट घालूनही चालकाला भरावा लागू शकतो २००० रुपयांपर्यंत दंड; जाणून घ्या काय आहे नियम
राज्यसभेच्या निमीत्ताने पवारांकडून संभाजीराजेंची कोंडी? मराठा राजकारण संपवण्याचा डाव?
सत्तेचा माज! शिवसेनेच्या बड्या नेत्यांनी मुंबईतील कुटुंबाला वाळीत टाकले; वाचा नेमकं काय प्रकरण