Share

बॉलिवूड सोडून राजकारणात जाणार का? अक्षय कुमार म्हणाला, मी…

बॉलीवूडमधील सुपरस्टारपैकी एक अक्षय कुमार त्याच्या फिटनेसबमुळे नेहमीच चर्चेत असतो आणि लोकांना फिट राहण्यासाठी प्रेरित करत असतो. तसेच चित्रपटांव्यतिरिक्त अक्षय कुमार त्याच्या इतर गोष्टींमुळेही चर्चेत येत असतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुलाखत घेतल्यामुळे तो चांगलाच चर्चेत आला होता. (akshay kumar on politics)

मोदींच्या मुलाखतीनंतर तो लवकरच राजकारणात प्रवेश करेल असेही म्हटले जात होते. अनेकदा त्याच्या चाहत्यांना त्याने राजकारणात जावे असे वाटते. आता खुद्द अक्षय कुमारने राजकारणाबाबत प्रतिक्रिया दिली असून राजकारणात जाणार की नाही याचा खुलासा केला आहे.

पॉल मॉल, लंडन येथील इन्स्टिट्यूट ऑफ डायरेक्टर्समध्ये आयोजित ‘हिंदुजा आणि बॉलीवूड’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात अक्षय कुमारला बोलवण्यात आले होते. यावेळी त्याने पत्रकारांशी संवादही साधला होता. यावेळी बोलताना त्याला राजकारणाच्या प्रवेशाबाबत प्रश्न विचारण्यात आला होता.

राजकारणाच्या प्रवेशाबाबत त्याला विचारण्यात आले असता, अक्षय कुमार म्हणाला, मला राजकारणाबाबत विचारु नका. मी सिनेमातून आपले काम करण्याचा प्रयत्न करत आहे. चित्रपटात काम करुन मला खुप आनंद मिळतो. एक अभिनेता म्हणून मी समाजात असणाऱ्या समस्या आणि त्यांचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करत आहे.

पुढे अक्षय कुमार म्हणाला, मी बऱ्याचदा व्यावसायिक चित्रपट करतो, पण कधी-कधी सामाजिक समस्यांशी निगडित असे काही चित्रपटही बनवतो. मी वर्षाला ३-४ चित्रपट करतो. तसेच मी १५० चित्रपट केले आहेत, पण माझ्या हृदयाच्या सर्वात जवळचा चित्रपट म्हणजे ‘रक्षा बंधन’.

दरम्यान, अक्षय कुमारचा आगामी चित्रपट ‘रक्षा बंधन’ ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होत आहे, ज्याचे दिग्दर्शन आनंद एल. राय यांनी केले आहे. या चित्रपटात भाऊ-बहिणीचे सुंदर नाते दाखवण्यात आले आहे, अक्षय कुमार आणि भूमी पेडणेकर ही जोडी या चित्रपटात दिसणार आहे. यापूर्वी दोघेही ‘टॉयलेट एक प्रेम कथा’ या चित्रपटात एकत्र दिसले होते.

महत्वाच्या बातम्या-
PHOTO: ‘या’ गावात जन्माला आलं अनोखं बाळ; गावकरी म्हणाले, ‘हा तर देवाचा अवतार’
उद्धव ठाकरेंच्या आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली थेट पवारांची भेट; व्हायरल फोटोंमागील सत्य घ्या जाणून…
पवारांची ‘ती’ लेडी जेम्स बॉंड शिंदे गटात फूट पाडण्यासाठी गोव्यातील हॉटेलमध्ये पोहोचली होती

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now