Share

गर्लफ्रेंडचे पत्र वाचताच अक्षय केळकर ढसाढसा रडला, म्हणाला, “आठ वर्षांचं प्रेम आहे माझं पण…

मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम करुन आपल्या दमदार कामगिरीची छाप प्रेक्षकांच्या मनावर उमटवणारा प्रसिद्ध अभिनेता म्हणजे अक्षय केळकर (Akshay Kelkar ) होत. अभिनेता अक्षय केळकर बिग बॉस या रिॲलिटी शो मध्ये सध्या झळकत आहेत. सध्या अक्षय त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे.

अक्षय सध्या बिग बॉस मराठीच्या चौथ्या सिझनमध्ये दमदार कामगिरी करुन घराघरात आपली लोकप्रियता वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे. अक्षय केळकरने स्टार प्रवाह या मराठी वाहिनीवरील ‘बे दुने दहा’ या मालिकेतून मराठी मालिका विश्वात पदार्पण केले आहे.

सध्या अक्षय केळकर त्याच्या लव लाईफमुळे चर्चेत आला आहे. बिग बॉस मराठी या कार्यक्रमात प्रसिद्ध अभिनेता जितेंद्र जोशी यांने नुकतीच हजेरी लावली होती. त्यांच्या ‘गोदावरी’ या चित्रपटाचे प्रमोशन अगदी जोरदार सुरु आहे. त्यासाठीच जितेंद्र जोशी यांनी बिग बॉसमध्ये उपस्थिती दर्शविली होती.

यावेळी, त्याने अक्षय केळकरला त्याच्या गर्लफ्रेंडचे पत्र स्वतः जितेंद्र जोशीने वाचून दाखवले. तेव्हा अक्षय केळकर ढसाढसा रडू लागला. या पत्रामुळे अक्षय केळकरच्या गर्लफ्रेंडचे नाव रमा असे आहे सर्वांसमोर आले. या पत्रात अक्षयच्या गर्लफ्रेंडने त्याला प्रोत्साहन देणारे गोष्टी लिहील्या आहेत.

दरम्यान, अक्षय केळकर म्हणाला की, ‘आठ वर्षांचं प्रेम आहे माझं. खूप कठीण आहे हे पुढे. तिच्याही घरचे हे सर्व बघत असतील. ते पुढे जाऊन कठीण आहे. पण प्रेम आहे. मला शून्यापासून तिने बघितलंय आणि ती माझ्या घरच्यांना जास्त सांभाळते. मी त्यांच्याशी जास्त बोलत नाही.’

तसेच पुढे तो म्हणाला की, ‘तिचे टोपण नाव रमा आहे. रमा माधव ही जोडी फार आवडते. त्यामुळे मी तिला रमा म्हणतो. मी खरं नाव घेतलं तर काहीही होणार नाही. माझी आठ वर्ष तिथेच थांबतील.’ यानंतर अक्षय ढसाढसा रडू लागला. तेव्हा अक्षय एक दिवस तुझा असा येईल जेव्हा तिच्या घरचे स्वतःहून तूज्याकडे येतील असे म्हणत जितेंद्र यांनी अक्षयला समजावले.

महत्वाच्या बातम्या – 

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now