Share

संबंध ठेव नाहीतर संघातून काढेल म्हणत खेळाडूचे केले लैंगिक शोषण, अकोल्याच्या कोचला जन्मठेप

राज्यातील अकोल्यातून एक घटना समोर आली आहे. एका कोचने कबड्डी खेळणाऱ्या अल्पवयीन मुलीला स्पर्धेचे पाठवण्याचे आमिष दाखवून तिचे लैंगिक शोषण केले होते. आता या प्रकरणी न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. (akola coach life imprisonment)

या प्रकरणात पीडित मुलगी गर्भवती राहिली होती. आरोपी प्रशिक्षक शुद्धोधन सहदेव अंभोरे याच्याविरुद्ध अनेक ठोस पुरावे सापडले आहेत. त्यानंतर न्यायालयाने त्याला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्यामुळे पीडित मुलीला न्याय मिळाला आहे.

आरोपी प्रशिक्षकाने तिला राज्य आणि राष्ट्रीय स्तराची खेळाडू बनवण्याच्या बहाण्याने तिच्यावर अनेकवेळा लैंगिक अत्याचार केले. ही बाब ३० जुलै २०१८ ची आहे. पीडित मुलीने तिच्या तक्रारीत म्हटले आहे की, आरोपी प्रशिक्षकाने त्याच्याशी शारीरिक संबंध ठेवले नाही, तसेच कोणाला याबाबत सांगितले तर तिला संघातून हाकलून देण्याची धमकीही दिली होती. त्यामुळे तिला काहीही करता येत नव्हते.

लैंगिक शोषणामुळे पीडिता गर्भवती राहिली. किशोरीला प्रसूतीसाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले असता, तिथे तिने एका मुलीला जन्म दिला. मात्र ही किशोरी अविवाहित आई झाल्याचा संशय रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना आल्याने त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तरुणीची चौकशी केली असता तिने सर्व प्रकार त्यांना सांगितला.

पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी प्रशिक्षकाला ताब्यात घेतले. जेव्हा चौकशी सुरू झाली तेव्हा आरोपी प्रशिक्षकाने त्याच्यावरील सर्व आरोप साफ फेटाळून लावले. तो म्हणाले की, हे मुल त्याचे नाही. यानंतर पोलिसांनी आरोपीची डीएनए चाचणी केली, ज्यामध्ये मुलाचे वडील आरोपी प्रशिक्षक असल्याची पुष्टी झाली.

या प्रकरणावर आता कोर्टाने आरोपी प्रशिक्षकाला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच ३.१० लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. याशिवाय आरोपी प्रशिक्षक शुद्धोधन अंभोरे याला कलम ३५४ अन्वये ५ वर्षे आणि आणखी एका महिला कबड्डीपटूचा विनयभंग केल्याप्रकरणी कलम ५०६ अन्वये २ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या-
गुजरातप्रमाणे महाराष्ट्रातील शाळेत देखील भगवद्‌गीता शिकवली जावी; भाजपने केली मागणी
चुकूनही घरच्यांसमोर बघू नका ‘ही’ वेब सिरीज; बोल्डनेस आणि इंटिमेंट सीन्समुळे होईल तारांबळ
रंग खेळून घरी आल्यानंतर नवरा-बायको एकत्रच गेले अंघोळीला, दोन तासानंतर आढळले ‘या’ भयानक अवस्थेत

ताज्या बातम्या राज्य

Join WhatsApp

Join Now