भारतीय वंशाची तमिळ चित्रपट अभिनेत्री अकिला नारायणन युनायटेड स्टेट्सच्या म्हणजेच अमेरिकेच्या सशस्त्र दलात सामील झाली आहे. अकिला नारायणन हिने अमेरिकन सैन्यात वकील म्हणून नाव नोंदवून इतिहास रचला आहे. गेल्या वर्षी दिग्दर्शक अरुलच्या ‘कदमपरी’ या हॉरर थ्रिलरमधून तमिळमध्ये पदार्पण करणारी अकिला नारायणन आता यूएस आर्मीमध्ये भरती झाली आहे. (akila narayan join american army)
सशस्त्र दलात प्रवेश करण्यासाठी अकिलाला अनेक महिन्यांपासून अमेरिकन लष्कराचे कठोर लढाऊ प्रशिक्षणही घ्यावे लागले असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. यशस्वीरित्या प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरच अभिनेत्री अमेरिकन सैन्यात वकील म्हणून रुजू झाली आहे.
अमेरिकेत राहणार्या भारतीय वंशाच्या अभिनेत्रीने २०२१ साली प्रदर्शित झालेल्या ‘कदमपरी’ चित्रपटातून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. पृथ्वीने या चित्रपटाला संगीत दिले असून व्ही.टी.के. उत्थयन यांनी सिनेमाटोग्राफी केली आहे. हा चित्रपट सामाजिक संकल्पनेवर आधारित होता.
विशेष म्हणजे अकिला ‘नाइटिंगेल स्कूल ऑफ म्युझिक’ नावाची ऑनलाइन म्युझिक स्कूलही चालवत आहे. यामध्ये ती अनेकांना तिच्याकडे असलेली संगीताची कला शिकवते. याशिवाय तरुण समाजाला प्रेरणा देण्यासाठी अकिला अनेक कार्यक्रमही करत असते.
अकिला नारायणन ही आता अमेरिकन लष्करी कर्मचाऱ्यांचे कायदेशीर सल्लागार म्हणून काम पाहणार आहे. ती देशाची सेवा करण्यासाठी सैन्यात भरती झाली आहे. अनेकांनी तिच्या सेवेचे कौतुक केले असून तिच्या कुटुंबाचे अभिनंदन केले आहे.
अकिला नारायणन व्यतिरिक्त, सुमती नारायणन, नारायणन नरसिंगम, ऐश्वर्या नारायणन, सहगर कुंदावदिवेलू, उमा सहगर, आदित्य सहगर, अरविंद सेहगर हे त्यांचे कुटुंबीय अभिमानाने स्वत:ला लष्करी कुटुंब म्हणवून घेतात. तसेच अमेरिकन सैन्यात जाऊन देश सेवा करणे हे त्यांचे कर्तव्य मानतात.
महत्वाच्या बातम्या-
आता चोर घरात शिरला की वाजणार अलार्म, airtel ने फक्त ९९ रुपयांत आणले भन्नाट डिव्हाईस
रोहितचे सर्वात घातक शस्त्र बनणार ‘हा’ खेळाडू, कोहली-शास्त्री संपवत होते त्याची कारकीर्द!
‘जय हो अखंड रशिया, जय भारत’, हिंदू सेनेने पोस्टरबाजी करत रशियाला दिला पाठिंबा