काँग्रेसला मोठा धक्का! तीन वेळा मुख्यमंत्री झालेल्या नेत्याने सोडला पक्ष; सोनीयांना पत्र लिहीत म्हणाला…

काँग्रेसचा एक जेष्ठ नेता पक्षाला कायमचा रामराम ठोकणार आहे. त्या जेष्ठ नेत्याचे नाव एके अँटनी असे आहे. केंद्रीय मंत्री राहिलेल्या एके अँटनी यांनी सोनिया गांधींना पत्र लिहून आता सक्रिय राजकारणातून निवृत्ती घ्यायची आहे आणि यापुढे मी यापुढे कोणतीही निवडणूक लढवणार नाही, असं म्हटलं आहे. (ak antany leave congress party)

अँटनी (वय ८१) यांनी सोनिया गांधी यांना सांगितले आहे की, त्यांचा राज्यसभेचा कार्यकाळ २ एप्रिल रोजी संपत आहे. त्यानंतर त्यांना पुन्हा निवडणूक लढवण्याची इच्छा नाही. ते सध्या केरळमधून राज्यसभेचे खासदार आहेत. ए के अँटनी यांनीही आपण यापुढे दिल्लीत राहणार नसल्याचे सांगितले आहे. लवकरच ते तिरुअनंतपुरमला जाणार आहे.

५२ वर्षांपासून ते राजकारणात आहेत. १९७० मध्ये ते केरळमध्ये पहिल्यांदा आमदार झाले. ते काँग्रेस युवक आणि विद्यार्थी संघटनेचे नेते होते. अँटनी हे तीन वेळा केरळचे मुख्यमंत्री राहिले आहेत. वयाच्या ३७ व्या वर्षी ते केरळचे मुख्यमंत्री झाले.

अँटनी १० वर्षे काँग्रेस संसदीय समितीचे अध्यक्ष होते आणि पाच वेळा विधानसभेत पोहोचले. ते तीन वेळा केंद्रीय मंत्री होते आणि पाच वेळा राज्यसभेत पोहोचले होते. गेल्या वर्षी केरळ विधानसभा निवडणुकीदरम्यान अँटनी म्हणाले होते की, त्यांना आता निवडणुकीच्या राजकारणातून संन्यास घ्यायचा आहे.

अँटनी म्हणाले, मी सोनियाजींना सक्रिय राजकारण सोडण्याबाबत कळवले आहे. याची माहिती मी काही महिन्यांपूर्वी सोनिया गांधींना दिली होती. मी पीसीसी अध्यक्ष आणि इतर सहकाऱ्यांनाही कळवले आहे. पक्षाने मला अनेक संधी दिल्या असून काँग्रेसचा मी सदैव ऋणी राहीन. आता मला दिल्ली सोडून एप्रिलमध्ये तिरुअनंतपुरमला जायचे आहे.

ए के अँटनी यांना ‘कॉंग्रेसचे अँथनी’ म्हणूनही ओळखले जात होते. केरळच्या राजकारणात काँग्रेससाठी त्यांचे मोठे योगदान मानले जाते. इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या कार्यकाळात ते अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस होते. २००४ मध्ये त्यांनी दिल्लीच्या राजकारणात प्रवेश करण्यास सुरुवात केली. डॉ.मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये त्यांनी संरक्षण मंत्री म्हणून भूमिका बजावली होते.

महत्वाच्या बातम्या-
‘या’ फोटोत किती प्राणी लपले आहेत? शोधता शोधता होईल डोक्याचा भुगा, ९९% लोकं फेल
‘कपिल शर्मा शो’मधील दादीने म्हणजेच अली असगरने का सोडला होता शो? स्वत:च केला मोठा खुलासा
महाविकास आघाडी सरकारचा पलटवार, फडणवीसांसह भाजपाच्या ‘या’ बड्या नेत्यांना अटक, राज्यात खळबळ