Share

मुख्यमंत्र्यांना आदर्श म्हणून डोळ्यासमोर ठेवा, त्यांच्यासारखं सडपातळ व्हा; अजित पवारांचा पोलिसांना सल्ला

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या स्पष्ट वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत येत असतात. अनेकदा ते त्यांच्या भाषणात सर्वांना टोले लगावताना दिसून येतात. मुंबईत एका कार्यक्रमात अजित पवारांनी पोलिसांना चांगलंच सुनावलं आहे, तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे कौतूक केले आहे. (ajit pawar talk about police

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवा असा सल्ला अजित पवार यांनी पोलिसांना दिला आहे. पोलिसांनी मुख्यमंत्र्यासारखं सडपातळ असलं पाहिजे, त्यांच्यासारखं स्मार्ट असलं पाहिजे, असे अजित पवारांनी कार्यक्रमात म्हटलं आहे.

कार्यक्रमात अजित पवारांनी पोलिसांना फिटनेसच्या मुद्यावरुन कानपिचक्या दिल्या. अजित पवार म्हणाले,  पोलिसांची शारिरीक क्षमता चांगली असायला हवी. या कारणामुळे पोलिसांची बदनामी व्हायला नको. पोलिस शिपायांकडे पाहिल्यानंतर अनेकदा मनात विचार येतो की, उद्या एखाद्या गुन्हेगाराच्या पाठी पळायचं झालं तर यांना पळता येईल का?

पोलिसांना पळता येईल का? अशी शंका येण्याइतपत काही पोलिसांची पोटं सुटलेली असतात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे पाहा. ते कसे सडपातळ दिसतात. आमची तरी पोटं  सुटलेली आहे, पण पोलिसांनी स्मार्ट असलं पाहिजे. जेणे करुन गुन्हेगारांवर वचक राहिल, असेही अजित पवारांनी म्हटले आहे.

दरम्यान, मुंबईतील भाषा भवनाचे भूमिपूजन शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडले. या सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह मराठी भाषामंत्री सुभाष देसाई, मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख, मराठी भाषा राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम आदी नेते उपस्थित होते.

या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठी भाषेबाबत भाष्य केले आहे. मराठी भाषेवर झालेले आक्रमण खपवून घेणार नाही, असे म्हटले आहे. मराठी भाषेबद्दल बोलण्यापेक्षा मराठी भाषेमध्ये बोला. विरोधकांनी कितीही टीका केली तरी आपल्याला त्याची काहीही पर्वा नाही, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-
आर्यन खान ड्रग्स प्रकरणातील मुख्य साक्षीदाराचा अचानक मृत्यू, बायकोनं सांगितलं नेमकं काय घडलं
सिद्धार्थ जाधवला ‘Filmfare Award’ भेटल्यानंतर कुशल बद्रिके झाला भावूक, म्हणाला, ‘आज ते सर्कल पूर्ण झालं’
सनई चौघडे वाजताच वयोवृद्धांनी केला ‘ब्रेक डान्स’, हातात काठी घेऊन धरला जबरदस्त ठेका, पाहा धमाल VIDEO

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now