Share

‘..त्यावर बोलण्याची माझी लायकी नाही’; असं काय झालं की अजितदादांनी काढली स्वत:चीच लायकी

ajit pawar

सध्या शिवसेनेत आणि महाविकास आघाडीत खळबळ माजलेली आहे. राजकारण तापलेले आहे आणि महाविकास आघाडी सरकार कोसळण्याच्या मार्गावर आहे. यावेळी एकनाथ शिंदेंच्या बंडामागे भाजपचा हात आहे असा आरोप काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांकडून करण्यात आला होता.

अजित पवारांना विचारण्यात आलं होत की, भाजपाचा यामध्ये काही हात आहे का असं तुम्हाला वाटतं का? या प्रश्नावर अजित पवार म्हणाले की, मला वाटत नाही यामध्ये भाजपाचा काही रोल आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलही म्हणाले की, या बंडामागे भाजपाचा काहीही हात नाही.

त्यावर शरद पवारांनाही हाच प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, अजित पवारांनी मुंबईची स्थिती पाहून हे वक्तव्य केलं असेल. इथं प्रत्यक्ष लोक हलवणं आणि हे ऑपरेशन करणं यात एकनाथ शिंदे यांचे सहकारी दिसतात. अजित पवारांना स्थानिक माहिती जरूर आहे. परंतु गुजरात आणि आसामची स्थिती आम्हाला अधिक माहिती आहे, असं पवार म्हणाले होते.

त्यावर आज पुन्हा अजित पवारांना शरद पवारांच्या या वक्तव्याबाबत विचारण्यात आले. त्यावर अजित पवार म्हणाले की, पवारसाहेब बोलले ते योग्यच आहे. मला फक्त महाराष्ट्रातील राजकारणाबाबत जाण आहे. साहेबांनी एका स्टेटमेंट केल्यानंतर त्यावर बोलण्याची माझी लायकी नाही, असं अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं.

अजित पवार पुढे म्हणाले की, शिंदे यांच्या बंडामागे भाजपचा हात आहे का? याबाबत मी काल वक्तव्य केलं होतं. त्यानंतर पवारसाहेबांनी वक्तव्य केलं आहे. महाराष्ट्रापुर्ती मला जेवढी माहिती आहे, कालपर्यंत जे मला पाहायला मिळालं, त्याबाबत मी बोललो होतो. पवारसाहेब आमचं दैवत आहे, आमचे सर्वोच्च नेते आहेत.

साहेबांनी एकदा स्टेटमेंट दिलं की त्यावर बोलण्याची माझी लायकी नाही. दरम्यान, संजय राऊतांनीही भाजपवर गंभीर आरोप केले होते. तसेच संजय राऊतांनी बंडखोर आमदारांना मुंबईत येऊन दाखवा असं चॅलेंज केलं आहे. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी २४ तासांत परत येण्याचा इशारा देऊनही बंडखोर आमदार आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.

महत्वाच्या बातम्या
शिंदे गटानं शिवसेनेचा डाव उलटवला; आता झिरवळ बंडखोरांची आमदारकी रद्द करूच शकत नाहीत
‘या’ चार नेत्यांमुळे उद्धव ठाकरेंनी राजीनामा देण्याचा निर्णय बदलला, जाणून घ्या
“शिंदे गटाने अजून पाठिंबा काढलेला नाही, त्यामुळे महाविकास आघाडी सरकार अजूनही मजबूत”
“शिंदे गटाने अजून पाठिंबा काढलेला नाही, त्यामुळे महाविकास आघाडी सरकार अजूनही मजबूत”

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now