एकनाथ शिंदेंनी बंडखोरी केल्यापासून महाविकास आघाडी सरकारवर आणि सगळ्यात जास्त शिवसेनेवर संकट ओढवले आहे. त्यातच संजय राऊतांनी बंडखोर आमदारांना परत येण्याचं आवाहन केलं होतं. संजय राऊत म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार सोडायला तयार आहोत पण आमदारांनी २४ तासात परत यावं.
त्यानंतर संजय राऊतांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादीकडून आणि काँग्रेसकडून नाराजी व्यक्त करण्यात येत होती. पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत उद्धव ठाकरेंना शेवटपर्यंत पाठिंबा देण्याचा निर्णय या बैठकीत झाला आहे. बैठकीत काय चर्चा झाली याबाबत अजित पवारांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
अजित पवार यावेळी म्हणाले की, महाराष्ट्रात जी काही परिस्थिती निर्माण झाली आहे अशावेळी महाविकास आघाडी सरकारमधील प्रमुख उद्धव ठाकरे यांना पुर्णपणे पाठिंबा देऊन राष्ट्रवादी काँग्रेस हे सरकार कसं टिकेल यासाठी प्रयत्न करत राहील. काही आमदार परत आले आहेत त्यात नितीन देशमुख, कैलास पाटील यांनी आपली भूमिका मांडली आहे.
गुवाहाटीमध्ये असलेल्या आमदारांना मुख्यमंत्र्यांनीही आवाहन केलं आहे. आजही त्यांच्या पक्षांच्या नेत्यांनी आवाहन केलं आहे. पण आमची भूमिका ही आघाडी सरकार टिकवण्याची आहे. यावेळी त्यांना भाजपाचा यामध्ये काही हात आहे का असं तुम्हाला वाटतं का? असं विचारण्यात आलं.
या प्रश्नावर अजित पवार म्हणाले की, मला वाटत नाही यामध्ये भाजपाचा काही रोल आहे. संजय राऊतांबाबत ते म्हणाले की, ते म्हणाले होते की सरकार २५ वर्षे टिकेल. पण तो त्यांचा बोलण्याचा अधिकार आहे. आपण काहीही बोलू शकत नाही. निधी वाटपातील दुजाभावाबद्दल ते म्हणाले की, आमच्यातील मित्र पक्ष उपस्थित करत आहेत की अजित पवारांनी निधीचं असं तसं केलं.
सरकार अस्तित्वात आल्यावर आपण सगळ्या जिल्ह्याचे पालकमंत्री नेमले होते. त्यांना निधी देताना कोठेही काटछाट केली नाही. पण कशामुळं त्यांनी तसं वक्तव्य केलं माहिती नाही. पण मी सगळ्यांना निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यांनी असं चॅनेलवर बोलण्यापेक्षा आमची बैठक होती त्यावेळी बोलायला पाहिजे होतं तर तिथेच गैरसमज दूर झाले असते.
महत्वाच्या बातम्या
मोठी बातमी! एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांना भाजपचा पाठिंबा, स्वत: शिंदेंनीच केले मान्य
शमशेरासाठी रणबीरने घेतली वाणी कपूरपेक्षा जास्त फी, आकडा वाचून अवाक व्हाल
‘या’ मल्टीबॅगर स्टॉकने घातला धुमाकूळ, २ वर्षात दिला ३२०० टक्के परतावा, १ लाखाचे झाले ३३ लाख
बंडखोरी करणारे शिवसेनेचे आमदार राहताय ‘या’ लक्झरी हॉटेलमध्ये, रुमचं भाडं ऐकून डोळे पांढरे होतील