ब्रम्हदेव आला तरी वीजबिल माफी मिळणार नाही, बिले भरावीच लागतील; अजितदादांनी ठणकावले

पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी पथदिव्यांचे तब्बल ५२५ कोटींचे वीजबिल थकवले आहे. यामुळे राज्यभरात याची चांगलीच चर्चा होत आहे. राज्य सरकारही या वीज बिलांबाबत विचार करत आहे. असे असताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी या प्रकरणावर मोठे विधान केले आहे. (ajit pawar on light bills)

पुणे जिल्ह्यातील पथदिव्यांच्या थकलेल्या वीज बिलाच्या व्याजाला सवलत देण्याचा प्रयत्न राज्य सरकार करणार आहे. पण ब्रम्हदेव जरी आला तरीही आम्ही वीजबिले माफ करणार नाही. बिले ही भरावीच लागणार आहे, असे अजित पवारांनी म्हटले आहे.

पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी पथदिव्यांचे ५२५ कोटींचे वीजबिल थकवले आहे. यामध्ये ३१८ कोटी मूळ थकबाकी व २०७ कोटी रुपयांचे व्याज आहे. या व्याजाला सवलत देण्याचा राज्य सरकार प्रयत्न करणार आहे. परंतू ब्रम्हदेव आला तरी हे वीजबिल माफ होणार नाही, असे अजित पवारांनी म्हटले आहे.

बारामती तालुक्यातील थोपटेवाडी ग्रामपंचायतीने नवीन पथदिव्यांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांना निवेदन दिले होते. यानंतर अजित पवारांनी हे विधान केले आहे. तसेच शेती पंपाच्या वीजबिल वसुलीसाठी मागील महिन्यात महावितरणने विद्युत रोहित्र बंद करण्याचा सपाटा लावला होता. पण विरोधानंतर मार्च महिन्यापर्यंत वीज कनेक्शन न तोडण्याचा निर्णय महावितरणने घेतला होता.

दरम्यान, अजित पवारांनी वेगवेगळ्या मुद्यांवर भाष्य केले आहे. बारामती शहरातील विकासकामे मोठ्या गतीने सुरु आहे. या पार्श्वभूमीवर नव्याने स्थापन झालेल्या माळेगाव नगरपंचायतीचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे, असे अजित पवारांनी म्हटले आहे.

तसेच यावेळी अजित पवारांनी सुपेच्या विमानतळावरही भाष्य केले आहे. सुपे परीसरातदेखील मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरु आहे. विमानतळाबाबत कोणतीही चर्चा सुरु असली तरी पुणे जिल्ह्याला मिळणारे विमानतळ हे सुपे परीसरातच असेल, असे अजित पवारांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-
तुमच्या हक्काचे मुंबईतील घर सोडून जाऊ नका; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची कळकळीची विनंती
गाडी फुल होण्याच्या आधी भाजपमध्ये या नाहीतर.., प्रवीण दरेकरांची शिवसैनिकांना खुल्ली ऑफर
नोकरी सोडूून सुरू हा सुपरहिट बिझनेस, आरामात होईल महिन्याला ५ ते १० लाख रुपयांची कमाई