राज्यात लवकरच महापालिकेच्या निवडणूका होणार आहे. त्यामुळे सर्व पक्षातील नेते आपआपल्या पक्षाला लोकांनी निवडूण द्यावे, यासाठी जय्यत तयारी करत आहे. त्यामुळे पुणे भाजपने आघाडी घेत पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुण्यात आणलं आणि त्यांच्याकडून मेट्रोसह विविध प्रकल्पांचे उद्घाटन करुन घेतले. (ajit pawar in narendra modi programme)
यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारही नरेंद्र मोदींसोबत उपस्थित होते. अशात एका कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर निशाणा साधत भाव खाल्ला आहे. तसेच यावेळी अजित पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना मेट्रो मार्गिका व इतर कामांसाठी साकडंही घातलं आहे.
एमआयटी महाविद्यालयाच्या मैदानावर रविवारी झालेल्या मुख्य कार्यक्रमात मोजकीच भाषणं झाली. महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या भाषणानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाषण दिले. त्यावेळी उपस्थित असलेल्या लोकांनी मोदी.. मोदी… अशी घोषणाबाजीही केली पण त्यानंतर अजित पवार भाषणाला आले आणि शांतता पसरली.
अजित पवारांनी भाषणाच्या सुरुवातीलाच पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले. तसेच पुणेकरांच्या सहनशिलतेला दाद देत अजित पवारांनी मेट्रोला लागलेल्या विलंबावरुन विरोधी पक्षांना टोलाही लगावला. यावेळी अजित पवारांनी, जशी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यामुळे नागपूर मेट्रो लवकर सुरु झाली, तशीच पुण्यासाठीही द्यावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे.
भाषणाच्या शेवटी मात्र अजित पवारांनी नाव न घेता राज्यपालांवर निशाणा साधला आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमात भगतसिंग कोश्यारी शेजारीच बसलेले होते. छत्रपती शिवाजी महाराजांबाबत त्यांनी वक्तव्ये केली होती, त्या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी त्यांना टोला लगावला आहे.
काही मान्यवर वक्तींकडून अनावश्यक वक्तव्ये केली जात आहे. ते महाराष्ट्राला परवडणारे नाही, त्यामुळे याकडेही लक्ष द्यावे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी राजमाता जिजाऊ यांच्या संकल्पनेतील स्वराज्याचा पाया रचला. महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रचला. सत्यशोधक विचारांचा प्रसार केला. माझ्या मनात कुणाबद्दलही आकस नाही. पण या महामानवांच्या कार्यांच्या उत्तुंग विचारांचा आदर्श आपल्या सर्वांना पुढे घेवून जायचे आहे, असं पवार म्हणाले.
अजित पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोरच थेट राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची तक्रार केली आहे. त्यामुळे मोदींच्या सभेत अजित पवारांनीच भाव खाल्ल्याचे म्हटले जात आहे. याची सोशल मीडियावरही चर्चा रंगली आहे. गेल्या २ वर्षांपासून महाविकास आघाडी आणि राज्यपाल भगतसिंग यांच्यात वाद सुरु आहे.
महत्वाच्या बातम्या-
शिवरायांबाबत वक्तव्य करणाऱ्या राज्यपालांना अजित पवारांनी झाप झाप झापले, म्हणाले…
वाहने उचलून नेणार नाही! मुंबईच्या नवीन पोलीस आयुक्तांचे मुंबईकरांना खास गिफ्ट, पण ‘ही’ अट लागू
ह्रदयद्रावक! बर्फ वितळवून तहान भागवत आहेत भारतीय विद्यार्थी, सुमीमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांचे व्हिडिओ व्हायरल