‘विकासकामांच्या माध्यमातून मोदींनी लोकांची मनं जिंकली’, अजित पवारांनी केले तोंडभरून कौतुक

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणावरून भाजपवर टीका करताना दिसतात. परंतु यावेळी त्यांनी भाजपवर टीका न करता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले आहे. पुण्यामधील एका पत्रकार परिषदेमध्ये बोलत असताना, जे लोक विकासाबद्दल बोलतात त्यांनाच जनता मत देते, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

यावेळी “पंतप्रधान मोदी जेव्हा सत्तेत आले तेव्हा त्यांनी विकासकामांच्या माध्यमातून लोकांची मनं जिंकली. जे लोकं विकासाबद्दल बोलतात त्यांनाच जनता संधी देते. वादांमध्ये रस असणारे फार थोडे लोक आहेत,” अशा शब्दात अजित पवारांनी मोदींचे कौतुक केले आहे.

याचबरोबर, “तुम्ही अनेकदा असे प्रश्न विचारतात. मात्र असे फार थोडे लोक आहेत ज्यांना या वादांमध्ये सर असतो. जे लोक विकासाबद्दल बोलतात त्यांना जनता संधी देते. पंतप्रधान मोदींनी सत्तेत आल्यानंतर विकासकामांच्या माध्यमातून लोकांची मनं जिंकली आहेत,” असे देखील पवारांनी बोलून दाखवले आहे.

पत्रकार परिषदेमध्ये बोलत असताना त्यांनी ६ मार्च रोजी मोदी पुणे दौऱ्यावर येणार असल्याची माहिती दिली आहे. तसेच “पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांचा मानसन्मान ठेवला गेला पाहिजे. पंतप्रधान देशाच्या कोणत्याही भागात जाऊ शकतात, तो त्यांचा अधिकार आहे. लोकशाही पद्धतीने निवडून मोदी पंतप्रधान झाले आहेत.

त्यामुळे पंतप्रधान मोदी पुणे दौऱ्यावर आल्यानंतर त्यांच्या कार्यक्रमामध्ये पालकमंत्री म्हणून सहभागी होणार आहे,” अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे. मुख्य म्हणजे नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर आल्यानंतर या दौऱ्यात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना देखील सहभाग नोंदवण्याची विनंती करण्यात आली आहे.

परंतु दुसऱ्या बाजूला अल्पसंख्याक मंत्री नबाव मलिक यांना ईडीने अटक केल्यामुळे मोदींच्या पुणे दौऱ्यावर विरोधकांनी विरोध दर्शविला आहे. दरम्यान या पत्रकार परिषदेत अजित पवार यांना भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांच्याकडून जाहीर होणाऱ्या यादीविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना “मग मी काय करु. मी सुद्धा तुरुंगात जाऊ का? मी यावर प्रतिक्रिया देणार नाही. मी केवळ विकासासाठी काम करतो,” असे अजित पवार यांनी म्हटले.

महत्वाच्या बातम्या
रितेशचा श्रीवल्ली गाण्यावर डान्स पाहताच जेनेलियाने दिला धक्का आणि.., व्हिडीओ पाहून खळखळून हसाल
मोठी बातमी! संभाजीराजेंनी उपोषण घेतले मागे, सरकारने मान्य केल्या ‘या’ मागण्या
अमिताभ यांचा नातू अगस्त्य नंदाची बॉलिवूडमध्ये एन्ट्री, सुहाना खानसोबत ‘या’ चित्रपटात करणार काम
सुनील दत्त यांच्या ‘या’ चित्रपटाची गिनीज बुकमध्ये आहे नोंद, कारण वाचून आश्चर्यचकित व्हाल