Share

अजित पवार, दानवे, राणांसह ३७२ बड्या नेत्यांचा वीजबील थकबाकीचा आकडा आला समोर: वाचा यादी

राज्यात कोळशाचा तुडवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्य सरकार लोडशेडिंग सुरु करताना दिसून येत आहे. तसेच महावितरणाकडून विजबिल थकबाकी वसूल करण्यासाठी काही ठिकाणचा वीजपुरवठा ऐन उन्हाळ्यात खंडित करण्यात आला आहे. (ajit pawar danave lightbill pending)

अशात महावितरणाने मंत्री आणि आमदारांच्या थकीत विजबिलाची यादी जाहीर केली आहे. यावेळी काही आमदारांनी तर लाखो रुपयांचे महावितरणाचे बिल थकवले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री आणि आरोग्यमंत्री यांच्यासह आमदार, खासदारांचे या यादीत नाव आहे.

सर्वसामान्यांचे आणि शेतकऱ्यांचे विज बिलावरुन वीजपुरवठा खंडित करणारे महावितरण आता लोक प्रतिनिधींची लाखो रुपयांची थकबाकी कशी वसूल कऱणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ३० एप्रिल २०२२ पर्यंत राज्यातील अतिमहत्वाच्या आमदार-खासदार आणि मंत्री असे ३७२ नेत्यांची नावे यात सामील आहे.

नेते आणि त्यांची थकबाकी-
उपमुख्यमंत्री अजित पवार- २५ हजार
गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील- ३ हजार ५४१
आरोग्यमंत्री राजेश टोपे- चार लाख
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात- १० हजार
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले- २ लाख ६३ हजार

राज्यमंत्री विश्वजीत कदम- २० हजार
श्रीमंत युवराज संभाजीराजे- १ लाख २५ हजार
माजी मंत्री सुभाष देशमुख यांचे तीन वीज कनेक्शन असून त्यांची ६० हजार रुपये थकबाकी आहे.
भाजप आमदार जयकुमार गोरे- सात लाख
केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे- ७० हजार

आमदार समाधान आवताडे- २० हजार
राजेंद्र राऊत बार्शी- ३ लाख ५३ हजार
आमदार संग्राम थोपटे- १ लाख
शिवसेना आमदार सुहास कांदे- ५० हजार
आमदार रवी राणा- ४० हजार

अशा ३७२ मंत्र्यांची, आमदारांची आणि खासदारांची विजबील थकबाकी बाकी आहे.

महत्वाच्या बातम्या-
‘खाजगीकरणाची खाज वाढायला लागली, अजून कुठे कुठे खाजवणार?’; उद्धव ठाकरेंचा केंद्राला खोचक सवाल
मुस्लिम कुटुंबाचे योगी प्रेम; राम मंदिराच्या उभारणीसाठी 90 लाखांची वैयक्तिक मालमत्ता देण्याची केली घोषणा
कॅमेऱ्याजवळ येताच उप्स मोमेंटची शिकार झाली दिपीका पादूकोन, गाडीतून उतरताच.., पहा व्हिडीओ

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now