महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त औरंगाबादमध्ये एक सभा घेतली होती. यावेळी ते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. त्यांनी यावेळी मशिदींवरील भोंग्यांवर भाष्य केलं, तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही टीका केली होती. (ajit pawar criiticize raj thackeray)
एका तासाच्या भाषणात राज ठाकरे २० मिनिटे शरद पवारांवर टीका करताना दिसून आले. पवार हे जातीयवादी असल्याचा पुनरुच्चार करत पुरंदरे केवळ ब्राम्हण असल्यामुळए पवारांनी त्यांना त्रास दिला, असा गंभीर आरोपही राज ठाकरे यांनी केला होता.
आता राज ठाकरेंच्या या वक्तव्यांवर उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी ते चांगलेच संतापलेले दिसले. पठ्ठ्याने अजून सोसायटी काढली नाही आणि पवार साहेबांवर बोलतो, अशी घणाघाती टीका अजित पवारांनी राज ठाकरेंवर केली आहे.
जेष्ठ नेते शरद पवार यांनी ५० वर्षांचं राजकारण लोककल्याणासाठी केलं. शरद पवार सत्तेसाठी कधीच हापापलेले नाहीत. अनेक आमदारांचा विरोध असताना त्यांनी मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिलं. सत्ता गेली तरी चालेल पण मी बाबासाहेबांचं नाव देणार असे पवार त्यावेळी म्हणाले होते, असे अजित पवारांनी म्हटले आहे.
तसेच पवारसाहेब ४ वेळा मुख्यमंत्री होते, १० वर्षे देशाचे कृषीमंत्री होते. संरक्षण मंत्री होते. काही वेळा देशामध्ये प्रसंग घडला तर सर्वांना एकत्र आणण्याचे काम पवारांनी केलं होतं. यांचं जेवढं वय आहे, तेवढा पवार साहेबांचा अनुभव आहे. हे काय गप्पा मारतायत. पठ्ठ्याने आतापर्यंत सोसायटी काढली नाही अन् हा पवारांवर बोलतो. धुडगूस अन् धिंगाना घालण्यासाठी अक्कल लागत नाही, कामं उभी करायला अक्कल लागते, अशी टीका अजित पवारांनी केली आहे.
तसेच १९९५ ते १९९९ च्या वेळी भाजप सेनंच सरकार होतं. त्यावेळी यांना पण काही काम करता आली असती ना… जो व्यक्ती लोकांच्या मनामध्ये विष कालवायचं काम करतोय, त्याने त्याच्या आयुष्यात कधी साखर कारखाना काढला का? कुठली सुतगिरणी उभी केली का? कुठली शिक्षण संस्था काढली का? असेही सवाल अजित पवारांनी उपस्थित केले आहे.
महत्वाच्या बातम्या-
आता काही खरं नाही! ठाकरेंना नडने पडले महागात; राणा दाम्पत्याच्या घरावरही गदा..
..तर त्याच मैदानावर सभा घेणार, त्यापेक्षा जास्त गर्दी जमवणार, अन् त्याच भाषेत राज ठाकरेंना उत्तर देणार
”जे हात भोंगे आणि लाऊडस्पीकर काढायला येतील ते परत जाणार नाहीत”