Politics: हिवाळी अधिवेशनापासून अजित पवार संभाजी महाराज यांच्यावरील वादग्रस्त वक्तव्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. त्यात नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी आणखी एका व्यक्तीचा चुकीचा उल्लेख केला. यामुळे राजकीय वातावरण चांगलेच पेटले आहे.
भाजपच्या नेत्यांकडून अजित पवारांविरोधात (Ajit Pawar ) आक्रमक भूमिका घेतली जात आहे. अजित पवार यांनी एका भाषणात ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले’ म्हणण्याऐवजी ‘ क्रांतीज्योती सावित्रीबाई होळकर’ असे म्हंटले आहे.
यामुळे त्यांनी एका नव्या वादाला आमंत्रण दिले आहे. या प्रकरणी भाजप- राष्ट्रवादी यांच्यात पुन्हा एकदा मोठा वाद सुरू झालाय. या पार्श्वभूमीवर भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे नेते आचार्य तुषार भोसले यांनी अजित पवारांना टीका करत लक्ष्य केले होते.
“वाचाळवीर अजित पवारांनी याआधी संभाजी महाराजांच्या मुद्यावरून हिंदूंच्या भावना दुखावल्या. आता पुन्हा क्रांतीज्योती सावित्रीमाईंचा अपमान केला आहे.” असे म्हणत त्यांनी अजित पवारांना वाचाळवीर असा टोलाही दिला होता.
तसेच यावेळी तरी अजित पवार मग्रूरपणे आपल्या भूमिकेवर ठाम राहणार की माफी मागणार ? असा प्रश्न तुषार भोसले यांनी उपस्थित केला होता. यावर उत्तर देताना राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी तुषार भोसले यांच्यावर जोरदार शाब्दिक ताशेरे ओढले.
“अरे झाकणझुल्या आता दिवसाही गांजा ओढायला सुरुवात केलीस का? कोणत्या पंथाचा आहे हे आम्ही लवकरच सांगणार आहोत. त्याला कुठलाही धंदा नसल्याने तो नेहमीच अजित पवार यांच्यावर बोलत असतो.” असे म्हणत अमोल मिटकटी यांनी तुषार भोसले यांच्यावर तोंडसुख घेतले आहे.
महत्वाच्या बातम्या