Share

शनिवार रविवार शाळा सुरु ठेवून बुडालेला अभ्यासक्रम पूर्ण करा; अजितदादांचे शिक्षकांना आदेश

ajit pawar

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रसारामुळे राज्य शासनाने विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र कोरोनाचा विषाणूचा धोका कमी प्रमाणत झाल्याने पुन्हा शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. मात्र शाळा सुरू केल्या असल्या तरी नियमांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे.

तसेच पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणं बंधनकारक नाही. सध्याच्या परिस्थितीनुसार ज्यांना योग्य वाटतं त्या पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवावे, असे सांगण्यात आले आहे. तसेच तब्बल सातशे दिवस कोरोना विषाणूमुळे शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

विद्यार्थ्यांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिक्षकांना काही सूचना केल्या आहेत. याबाबत सोलापूर जिल्हा परिषदेच्या स्वच्छ शाळा, सुंदर शाळा उपक्रमाच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमात अजित पवार बोलत होते.

यावेळी बोलताना ते म्हणाले, गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. आता प्रत्यक्ष शाळा सुरु झाल्या आहेत पण अभ्यासक्रम भरुन काढण्याचं शिक्षकांसमोर एक मोठं आव्हान उभं ठाकलंय. यावरुन आता शिक्षकांनी शनिवार, रविवारी शाळा सुरु ठेवून अभ्यासक्रम भरुन काढला पाहिजे.’

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, सोलापूर जिल्हा परिषदेने राबवलेला स्वच्छ शाळा, सुंदर शाळा उपक्रम अतिशय अभिनंदनीय आहे. त्यामुळे स्वच्छ शाळा, सुंदर शाळा हा कार्यक्रम राज्यभरात राबवला गेला पाहिजे. त्याचबरोबर तो विभागातही राबवायला हवा अशी अपेक्षाही यावेळी अजित पवारांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षांबाबत एक माहिती बोर्डाकडून देण्यात आली आहे. आजपासून बारावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने हॉलतिकीट मिळणार आहे. दुपारी 1 च्या पुढे विद्यार्थ्यांना हॉलतिकीट डाऊनलोड करता येणार आहे. अशी माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डानं दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या
“मोदींनी ज्या रेल्वे स्टेशनवरती चहा विकला ते सुद्धा काँग्रेसने बांधलेय”
पादचारी वारकऱ्याला वाचवण्याच्या प्रयत्नात कार पंधरा फूट उडून भीषण अपघात; 2 जण जागीच ठार…
वाचून तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल! पतंग उडविताना अकरा वर्षीय मुलाचा टेरेसवरून तोल गेला; आणि पुढे… 
धक्कादायक! असदुद्दीन ओवेसींच्या दीर्घायुष्यासाठी समर्थकांकडून 101 बकऱ्यांचा बळी; वाचा संपूर्ण प्रकरण 

इतर राजकारण राज्य शिक्षण

Join WhatsApp

Join Now