’15 दिवसांत मराठा आरक्षणााचा प्रश्न मार्गी लावतो अस सरकारने सांगितले होते. मात्र, त्यांनी दिलेला शब्द पाळला नाही म्हणून मी हा निर्णय घेतला असल्याचे खासदार संभाजी छत्रपती (sambhajiraje) यांनी म्हंटले आहे. तसेच संभाजी छत्रपती यांनी मराठा समाजाच्या उन्नतीसाठीच्या सात मागण्या मंजूर व्हाव्यात म्हणून आजपासून त्यांनी उपोषण सुरू केलं आहे. (ajit pawar answering on question of sambhajiraje hunger strike)
याबाबत पत्रकार परिषदेदरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारले असता त्यांनी त्यांच्या खास शैलीत उत्तर दिले आहे. यावेळी बोलताना पत्रकारांनी अजित पवार यांना खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या उपोषणावर प्रश्न विचारला. त्यावर अजित पवार भडकल्याचं पाहायला मिळालं.
“आता घे पायताण आणि घाल माझ्या डोक्यात” असं उत्तर देत त्यांनी संभाजीराजेंच्या उपोषणावर बोलणं टाळलं. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ चर्चेचा विषय बनला आहे. आज अजित पवार यांनी तळजाई टेकडीवरील वन उद्यानातील विकासकामांचं उद्घाटन केलं.
तसेच यावेळी बोलताना अजित पवार यांनी टेकडीवर असलेल्या घाणीवरून पुणेकरांवर शाब्दिक निशाणा साधला. तळजाई परिसरात भटक्या कुत्र्यांचा त्रास वाढल्याच्या अनेक तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. याबाबत अजित पवार म्हणाले, ‘इथं पाळीव कुत्री घेऊन येऊ नका, कुत्र्याला तुम्हाला घरात काय गादीवर जवळ घेऊन झोपायच ते झोपा. आमचं काही म्हणणं नाही. पण इथं कुत्र्यांमुळ प्रश्न निर्माण होतोय, असे रोखठोक मत त्यांनी मांडले.
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, काही लोकं तळजाईला येताना श्वानांना घेऊन येतात. मात्र तसं त्यांनी करू नये. काय लाड करायचे आहेत तर ते घरी करा. कुत्र्यांना घरी झोपवा. नाहीतर मी इथे बिबटे सोडले असते. मात्र मला नागरिकांची काळजी आहे, असं म्हणत पवारांनी कोपरखळी मारली.
तसेच तळजाई टेकडीवर कचऱ्याच्या साम्राज्य वाढत असताना, नागरिक कुठेही कचरा टाकत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे. नागरिकांची ही कृती योग्य नसल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. याचबरोबर पुण्यात मोठ्या प्रमाणात काँक्रेटचे जंगल तयार व्हायला लागलं आहे. तरी सुदैवाने पुण्यात वन विभाग, सरंक्षण खात यांच्या मोठया जागा आहेत. तिथं हिरवाई राहिली पाहिजे असे आमचे प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
युक्रेन आणि रशियन हल्ल्याचा परिणाम भारताला भोगावा लागणार, ‘या’ गोष्टींमुळे होणार चिंतेत वाढ
डेव्हिड वॉर्नरने स्वत:चीच फ्रेंचायझी दिल्ली कॅपिटल्सला केले ट्रोल, ‘तो’ फोटो शेअर करत म्हणाला..
भारतातून युुक्रेनमध्ये शिकायला गेलेल्या १९ वर्षीय विद्यार्थ्याने मागितली ‘ही’ मदत, म्हणाला..
…तर आता तुमच्याही ‘डर्टी बारा’चे बारा वाजल्याशिवाय राहणार नाही, राऊतांचा सोमय्यांना इशारा