राज्यात भाजपला डावलून राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस पक्षांनी मिळून महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. महाविकास आघाडी सरकार मधील बरेच नेते हे त्यांच्या आक्रमक विधानांनी चांगलेच चर्चेत असतात. त्यामधील एक नाव म्हणजे राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार.
अजितदादा हे महाविकास आघडी सरकारमधील आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. अनेकदा ते विरोधकांवर तिखट शब्दात हल्लाबोल चढवतात. एवढच नाहीतर केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांवर देखील अजितदादा हे स्पष्टपणे आपली मत मांडतात. कित्येकदा अजितदादा हे या कारणामुळे वादाच्या भोवऱ्यात देखील सापडले आहेत. परंतु, त्यांनी आपला स्पष्ट व्यक्तेपणा सोडलेला नाहीये.
आता पुन्हा एकदा ते चांगलेच चर्चेत आले आहेत. पुरंदर तालुक्यातील निंबूत येथील समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या समता पॅलेस वातानुकूलित नुतन वस्तूच्या उद्घाटन समारंभात अजित पावर बोलत होते. मी तिजोरी नाही उघडली तर काय देणार “घंटा”? असे म्हणत त्यांनी जोरदार टोलेबाजी केली आहे.
बारामतीमध्ये बोलताना अजित पवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांना कानपिचक्या दिल्या. कार्यक्रमात बोलताना अजित पवारांनी निधी वाटपावरून केलेल्या विधानावरुन दत्तात्रेय भरणेंना आपल्या पदाची आठवण करुन दिल्यानंतर एकच हशा पिकला.
अजित पवार म्हणाले, ‘सार्वजनिक बांधकाम विभागाचे दत्ता मामा राज्यमंत्री आहेत. त्यांनी जिल्ह्यासाठी चांगला निधी आणला आहे. संजय जगताप आणि दत्ता मामांना सांगावे लागते. आमच्याही तालुक्यावर लक्ष ठेवा, फक्त तुम्ही राज्यमंत्री इंदापूरचे नाही. मलाच विनंती करावी लागते, मला तरी काही तरी द्या.’
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, ‘बांधकामाच्या चाव्या त्यांच्या हातात आहे, पण त्यांना माहिती नाही तिजोरीच्या चाव्या माझ्याकडे आहे. तिजोरीच्या चाव्या जर उघडल्या तर बांधकामाला पैसे मिळतील. मी तिजोरी उघडली नाही तर त्यांना काय मिळणार घंटा…’ असं अजित पवार म्हणाले.
दरम्यान, यावर आता गाडी घसरायला लागलीय त्यामुळे थांबतो, असं अजित पवार यांनी आपले भाषण संपवले. अजित पवारांच्या या वक्तव्यानंतर मात्र काही काळ कार्यकर्त्यांना हसू आवरेना झालं. तसेच काही वर्षांपूर्वी अजित पवारांनी धरणातल्या पाणीसाठ्यावरून केलेल वक्तव्य अजूनही लोकांच्या लक्षात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
कृष्ण प्रकाश यांचा नाद नाय! आपल्याच नावाने खंडणी उकळणाऱ्या आरोपीसमोर वेषांतर करून गेले अन्..
जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना महिला तुरुंगातच झाली गर्भवती, चौकशीत झाला धक्कादायक खुलासा
बास झाला त्रास, आता ठाकरे-पवारांनाच सांगतो, शिवसेना आमदाराचा एकनाथ खडसेंवर तीव्र संताप
“काश्मिरी पंडितांवर अत्याचार दहशवाद्यांनी केला होता, त्यासाठी मुस्लिमांना दोष देणं योग्य नाही”