Share

भारताच्या ‘या’ स्टार खेळाडूला IPL ऑक्शनमध्येही नाही मिळाला भाव, बेस प्राईजवरच विकला गेला

भारतीय क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेला IPL २०२२ च्या मेगा लिलावाच्या दुसऱ्या दिवशी कोलकाता नाइट रायडर्सने विकत घेतले. त्याची मूळ किंमत १ कोटी रुपये होती आणि कोलकाता व्यतिरिक्त इतर कोणत्याही फ्रँचायजीने रहाणेला खरेदी करण्यात रस दाखवला नाही. (ajinkya rahane sold 1 crore)

पहिलीच बोली १ कोटींची होती आणि केकेआरने या अनुभवी क्रिकेटपटूचा संघात समावेश करण्याचा निर्णय घेतला. ३३ वर्षीय अजिंक्य रहाणेने आतापर्यंत २१२ टी-२० सामने खेळले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर ही संख्या केवळ २० आहे. रहाणेने टी २० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत १ अर्धशतकासह एकूण ३७५ धावा केल्या आहेत.

२०१६ मध्ये रहाणेने भारताकडून शेवटचा टी-२० सामना खेळला होता. त्याने आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स, मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्सचे प्रतिनिधित्व केले आहे. तो आता केकेआरच्या जर्सीत दिसणार आहे. अजिंक्य रहाणे अलीकडे त्याच्या फॉर्ममुळे टीकाकारांच्या निशाण्यावर होता.

रहाणे आयपीएलपूर्वी रणजी करंडक खेळणार असून यामुळे त्याला त्याची कसोटी कारकीर्द पुन्हा रुळावर आणण्याची संधी मिळेल, असे मानले जात आहे. तसेच फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून भारत आणि श्रीलंका यांच्यात २ सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे.

दोन्ही संघ टी-२० सामन्यांची मालिकाही खेळणार आहेत. नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत रहाणेने तिन्ही सामने खेळले. यादरम्यान त्याच्या बॅटमधून केवळ एक अर्धशतक झळकले. रहाणेला मालिकेतील ६ डावात केवळ १३६ धावा करता आल्या.

जोहान्सबर्ग येथे खेळल्या गेलेल्या मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात त्याने ५८ धावा केल्या, तर सेंच्युरियन येथील पहिल्या कसोटीत त्याने ४८ धावा केल्या. याशिवाय तो काही विशेष कामगिरी करू शकला नाही. त्यामुळे रहाणे टीकाकारांच्या निशाण्यावर आला होता.

महत्वाच्या बातम्या-
हिजाबप्रकरणी ठाम भूमिका घेतल्याने जीवे मारण्याच्या धमक्या; भाजपा आमदाराच्या दाव्याने राजकीय वर्तुळात उडाली खळबळ
..आणि मिठी मारून दीर भावजयीने भररस्त्यात सोडला जीव, सत्य समोर आल्यानंतर पोलिसही हादरले
कंगना राणावत ‘गेहराइयां’ चित्रपटाला म्हणाली ‘कचरा’, पोर्नोग्राफी चित्रपटांशी केली तुलना

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now