काजोलची बहीण आणि अजय देवगणची मेहूणी तनिषा मुखर्जी तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फारशी बोलत नाही. मात्र, ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तनिषाचे अजून लग्न झालेले नाही पण तिला लग्न करायचे नाही असे नाही. तिने आता सांगितले आहे की, तिला कसा मुलगा हवा आहे. (ajay devgan sister in law want husband)
हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, एका मुलाखतीदरम्यान तनिषा मुखर्जीने तिच्या लग्नाबद्दलच्या विषयावर भाष्य केले आहे. तनिषाने सांगितले की, प्रेमात पडणं खुप रोमांचकारी असतं. कारण त्यातून नवनवीन गोष्टी अनुभवता येतात. मी त्या माणसाचा शोध घेत आहे, ज्याच्यासोबत मी बोर नाही झाली पाहिजे.
तसेच खाजगी आयुष्याबाबत तनिषाला विचारण्यात आले असता. तनिषाने खाजगी आयुष्याबाबत बोलण्यास नकार दिला आहे. खाजगी आयुष्याला मी खाजगी ठेवणेच पसंत करेल. जेव्हा मी लग्न करण्याचा निर्णय घेईल तेव्हा मी नक्कीच सगळ्यांना सांगेन, असे तनिषाने म्हटले आहे.
तनिषा मुखर्जीने तिच्या प्रोफेशनल लाईफबद्दल सांगितले आहे. तिने सांगितले की, ती सध्या अनेक प्रोजेक्ट् सांभाळत आहे. मला फक्त माझ्या कामावर पूर्ण लक्ष केंद्रित करायचे आहे. मी अनेक प्रोजेक्ट्सवर काम करत आहे आणि मला चित्रपटांची निर्मिती करायची आहे. तसेच सध्या मी वेगवेगळ्या स्क्रिप्ट्स वाचत आहेत ज्यात मला अभिनेत्री म्हणून काम करायचे आहे.
याआधी तनिषा मुखर्जीने तिचे असे काही फोटो शेअर केले होते, ज्यावरून तिने गुपचूप लग्न केल्याचा अंदाज चाहत्यांनी लावला होता. स्त्रिया लग्न झाल्यावरच पायात नेटल्स घालतात, तसेच नेटल्स तिने घातले होते आणि फोटोशूट केले होते. मात्र त्यावर आता तिने प्रतिक्रिया दिली आहे.
हिंदुस्तान टाईम्सशी संवाद साधताना तनिषा म्हणाली, मला नेटल्स घालायला आवडते. मला ते आवडले म्हणून मी त्याचा फोटो काढला आणि पोस्ट केला. मला लग्न करायचे आहे, पण मला माझ्या स्वप्नातला राजकूमार अजून सापडलेला नाही. मी जेव्हाही लग्न करेन तेव्हा जगाला नक्की सांगेन.
महत्वाच्या बातम्या-
अखेर शिवसेनेने भाजपला दणका दिलाच; सेना उमेदवाराने घेतलेल्या मतांमुळे हरला भाजप उमेदवार
जी गोष्ट भाजप-काँग्रेसला जमली नाही, ती ‘आप’ने दाखवली करुन; ‘या’ पाच कारणांमुळे पंजाबमध्ये मिळाले बहूमत
शमिता शेट्टी-राकेश बापट काही महिन्यांतच झाले वेगळे, ‘या’ गोष्टींवरून व्हायची सारखी भांडणे