अभिनेता अजय देवगण आणि अभिनेत्री काजोल हे बॉलिवूड इंडस्ट्रीतील लोकप्रिय जोडपे आहेत. दोघेही त्यांच्या मजेदार केमिस्ट्रीद्वारे चाहत्यांना प्रेरित करताना दिसत असतात. इतकंच नाही तर काजोल आणि अजय देवगण नेहमी त्यांच्या राहणीमानामुळे आणि कार कलेक्शनमुळे खूप प्रसिद्धी मिळवतात. (ajay devgan kajol house shivshakti)
दोघांकडे घर आणि कारसह अनेक महागड्या वस्तू आहेत आणि याच कारणामुळे दोघांचे नाव बॉलिवूडच्या श्रीमंत जोडप्यांच्या यादीत येते. आता नुकतेच त्यांच्या घराचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. फोटोंमध्ये हे घर खूपच आलिशान दिसत आहे.
अजय देवगण आणि त्याची पत्नी ज्या घरात राहतात, त्या घराचे नाव ‘शिवशक्ती’ असे आहे. अनोख्या आणि भन्नाट सजावटीमुळे त्यांचे हे घर नेहमीच चर्चेत असते. या घराशिवाय अजय देवगण आणि काजोलकडे मुंबई आणि जुहूमध्ये २५ कोटी रुपयांचे दोन अतिरिक्त अपार्टमेंट सुद्धा आहेत.
अजय देवगण आणि काजोलच्या लग्नाला आता २३ वर्षे पूर्ण होणार आहे. असे असताना आता काजोल आणि अजय देवगणच्या घराचे फोटो व्हायरल झाले आहे. या फोटोंमध्ये दिसून येते की, त्यांचे घरात पांढऱ्या रंगाचा वापर जास्त करण्यात आला आहे. तसेच खिडक्यांवरही लाकडाचं बारीक काम करण्यात आलं आहे. तसेच तिथे मीरर्ड ग्लास लावण्यात आला आहे.
घरातील ड्रॉईंगरूम खूप आरामदायक आणि एडजेस्टेबल आहे. तसेच अजय देवगणच्या घराच्या बाहेर असणाऱ्या भिंतीही खूप वेगळ्या पद्धतीने बनवण्यात आल्या आहे. तसेच घराचे वुडन आणि फ्लॉवर्स खूप नॅचरल आणि डिसेंट लुकचे आहे. घरात ब्राऊन कुशन्स आणि मोठं कपाट आहे. तसेच तिथे एक ड्रेसअप एरिया सुद्धा आहे. अनेक फोटोंच्या बॅकग्राउंडमध्ये तुम्हाला स्टेअरकेस सुद्धा दिसून येतील.
अजय देवगण आणि काजोलने हे घर २०२० च्या नोव्हेंबर महिन्यात खरेदी केले होते. त्यांनी हे घर त्यांची आई वीणा वीरेंद्र देवगण यांच्या नावावर खरेदी केले आहे. या घराची किंमत तब्बल ६० कोटी रुपये आहे. हा बंगला ५९० स्क्वेअर फुटमध्ये पसरलेला आहे.
महत्वाच्या बातम्या-
बाबरी पाडताना एकही शिवसेना नेता तिथे नव्हता, बाबरी पाडली तेव्हा मी तिथेच होता- देवेंद्र फडणवीस
रस्त्यावर येऊन तुम्ही नमाज पढता, याचे अधिकार तुम्हाला कुणी दिले? राज ठाकरेंनी पुढचं टार्गेट केलं स्पष्ट
भोंग्याच्या मुद्द्यावर राज ठाकरे बोलत असतानाच अजान झाली सुरू, भडकलेले राज म्हणाले, “आत्ताच्या आत्ता…”