एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्यासोबत राज्यातील काही मंत्र्यांसह शिवसेनेच्या ४० पेक्षा जास्त आमदारांनी बंडखोरी केली आहे. यामुळे महाविकास आघाडीला धोका निर्माण झाला आहे. अशात सर्वोच्च न्यायालयाने एकनाथ शिंदे यांच्या याचिकेवर आज सुनावणी दिली आहे. (ajay chaudhary react on supreme court decision)
एकनाथ शिंदेंच्या याचिकेवर आज सुनावणी देताना न्यायालयाने सर्व पक्षकारांना नोटीस बजावली आहे. न्यायालयाने उपसभापती अजय चौधरी, सुनील प्रभू आणि केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे. सर्वोच्च न्यायालयाने पाच दिवसांत या नोटीसला उत्तर द्यावे, असे म्हटले आहे.
आता या प्रकरणाची पुढील सुनावणी ११ जूलै रोजी होणार आहे. तसेच आमदारांनी १२ जूलैपर्यंत आपली बाजू मांडावी असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. पण तोपर्यंत शिवसेनेला बंडखोर आमदारांवर कारवाई करता येणार नाही, असेही न्यायालयाने म्हटले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर शिंदे गटासाठी हा मोठा दिलासा असल्याचे म्हटले जात आहे. तर महाविकास आघाडीसाठी हा मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे. या सुनावणीनंतर शिवसेनेचे विधीमंडळ गटनेते अजय चौधरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सर्वोच्च न्यायालायवर आमचा पुर्ण विश्वास आहे. १२ जूलै रोजी आम्हाला दिलासा देणारा निर्णय येईल, असा विश्वास अजय चौधरी यांनी व्यक्त केला आहे. तसेच न्यायालयाच्या निर्णयाच्या अनुषंगाने कायदेतज्ज्ञ रणनिती आखत आहे, असेही चौधरी यांनी म्हटले आहे.
शिंदे गटाकडे आमच्यापेक्षा जास्त संख्याबळ असल्याचे म्हटले जात आहे. पण विधानमंडळ हे संख्याबळ दाखवण्याची जागा आहे, असे अजय चौधरी यांनी म्हटले आहे. तसेच ती वेळ आल्यावर पाहू कोणाचं संख्याबळ जास्त आहे, असे म्हणत चौधरी यांनी एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे.
तसेच दीपक केसरकर कुठून आले आहेत, हे त्यांना पाहावं. शिवसेना काय आहे हे त्यांनी आम्हाला सांगू नये. मी आठवीत असल्यापासून शिवसेनेत आहे. उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत शिवसेना चालवत आहे, असेही अजय चौधरी यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
“एकादशीला पांडुरंगाची पूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्तेच होणार हे सुप्रीम कोर्टानेही सांगितले”
मालेगावच्या नदीतून वाहताना दिसले रक्तमिश्रित पाणी, लोकांनी सांगितले धक्कादायक कारण
disney ला कळाली त्यांची चूक, जॉनी डेपची माफी मागत दिली तब्बल एवढ्या हजार कोटींची ऑफर