Share

शिंदेंना मोठा झटका! चौधरींच्या गटनेतेपदाला विधानसभा उपाध्यक्षांची मान्यता; ‘त्या’ १२ जणांची आमदारकी रद्द होणार?

एकनाथ शिंदेंसोबत ज्या आमदारांनी बंडखोरी केली आहे त्यातील १२ आमदारांच्या विरोधात शिवसेनेने आक्रमक पावित्रा घेतला आहे. शिवसेनेने या आमदारांच्या विरोधात उपाध्यक्षांकडे मागणी केली आहे की, त्यांची आमदारकी रद्द करा. शिवसेना नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार याबाबतीत कायदेशीर पिटीशन दाखल केली गेली आहे.

आमदार पक्षाच्या विधीमंडळात गैरहजर होते आणि त्यांच्यामुळं व्हिप काढलेला असतानाही ते आमदार उपस्थित न राहिल्याने त्यांची आमदारकी रद्द करा अशी मागणी शिवसेनेने केली आहे. त्यानंतर आता पुन्हा शिंदे गटाला झटका देणारी बातमी समोर आली आहे.

अजय चौधरी यांची गटनेते पदी निवड करण्यात आली आहे. गटनेते पदी अजय चौधरी यांनाच मान्यता देण्यात आली आहे. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या आदेशाने ही नोंद करण्यात आली आहे. त्यानंतर १२ आमदारांना अपात्र ठरवण्याबाबत ऑनलाईन सुनावणी करण्यात येणार आहे.

आज अपात्र आमदारांना नोटीस पाठवण्यात येणार आहे. एका दिवशी चार आमदारांची सुनावणी करण्यात येणार आहे. विधानसभा उपाध्यक्ष १२ आमदारांना नोटीस देऊ शकतात. आमदारांना नोटीस पाठवल्यानंतर विधानसभा उपाध्यक्ष प्रत्येक आमदाराची बाजू ऐकून घेणार आहेत.

कोरोनानंतर आमदारांना ऑनलाईन सुनावणी हवी आहे का? ते स्वत: उपस्थित राहू शकतात का? हे ठरवलं जाणार. जर ते ऑनलाईन उपस्थित राहणार असतील तर त्यासाठी नॅशनल इनफॉरमेटिक सेंटरकडून देण्यात आलेल्या बँडविडथचा वापर करावा लागेल. या बँडविडथची उपलब्धता पाहिली तर दिवसाला २ ते ४ आमदारांची सुनावणी होऊ शकते. विधान भवनाच्या वतीने ही सुनावणी लवकरात लवकर पार पडावी यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

ही अर्धन्यायिक प्रक्रिया आहे. यासाठी वेळेची मर्यादा नसली तरी लवकरात लवकर याचा सोक्षमोक्ष लावला जाईल. हे सर्व पाहता शिंदे गटाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. नुकतेच एकनाथ शिंदे गुवाहाटीहून रवाना झाले आहेत. दुसरीकडे संजय राऊतांनी या बंडखोर आमदारांना मुंबईला येण्याचं चॅलेंज दिलं आहे.

महत्वाच्या बातम्या
“आता कुणाला खरा वाघ म्हणायचं?”, मराठी अभिनेत्रीच्या ‘त्या’ पोस्टने राजकीय वर्तुळात खळबळ
“उद्धवसाहेब तुम्हाला माफ करतील, तुम्ही सगळे परत या…”, आमदार संतोष बांगर ढसाढसा रडले
शिवसेना खासदार प्रतापराव जाधवांचे गंभीर आरोप; म्हणाले, ‘राष्ट्रवादीने शिवसेना संपवली’
जे गेलेत त्यांचा विचार करु नका, मेळावे लावा, शाखा पिंजून काढा; उद्धव ठाकरे आक्रमक

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now