संजय लीला भन्साळी त्यांच्या पद्मावत या चित्रपटामुळे खुप वादात सापडले होते. या चित्रपटात दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांच्या प्रमुख भूमिका आहेत. दीपिका पद्मावतीच्या भूमिका साकारली होती, तर रणवीर खलनायक अलाउद्दीन खिलजीच्या भूमिकेत दिसला होता.
या चित्रपटाबाबत एक धक्कादायक खुलासा झाला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, भन्साळी या चित्रपटासाठी सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांना कास्ट करायचे होते. ऐश आणि सलमाननेही या चित्रपटाला होकार दिला होता.
पण ऐश्वर्याच्या एका अटीमुळे भन्साळींनी या दोघांसोबत काम केले नाही. सलमान आणि ऐश्वर्याच्या नात्यात दुरावा आला होता त्या काळातील ही गोष्ट आहे. सलमान खानने अलाउद्दीन खिलजीची भूमिका साकारावी अशी ऐश्वर्याची इच्छा होती.
कारण ती खलनायकाची भूमिका आहे जी आता रणवीर सिंग साकारत आहे. यामुळे तिचा आणि सलमानचा कोणताही सीन एकत्र दिसणार नाही, असे ऐश्वर्याने सांगितले. ऐश्वर्याची ही अट ऐकून सलमानही हैराण झाला आणि त्याने चित्रपट करण्यास नकार दिला.
ऐश्वर्याच्या या अटीने सारेच बिघडले आणि अॅश-सलमानची जोडी पुन्हा कधीही होऊ शकली नाही. आता या चित्रपटात दीपिका आणि रणवीर सिंगचा एकही शॉट नाहीये हे सर्वांना माहिती आहे. शाहिद कपूर पद्मावतीच्या पतीची भूमिका साकारत आहे.
या चित्रपटात दीपिका आणि शाहिद रोमान्स करताना दिसणार आहेत. पण या भूमिकेसाठी भन्साळींची पहिली पसंती ऐश्वर्या आणि सलमान होते. भन्साळींच्या ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटात एकत्र काम केल्यानंतर ही जोडी लोकप्रिय झाली होती.
महत्वाच्या बातम्या
ब्राम्हण संघटनांनी घेतली शरद पवारांची भेट, केल्या ‘या’ तीन मागण्या; शरद पवार म्हणाले…
आयपीएलमधील चांगल्या कामगिरीचे ‘या’ खेळाडूंना मिळाले फळ, टी-२० संघात मिळाली जागा
‘शरद पवारांच्या राजकारणामुळे निजामांच्या अवलादी महाराष्ट्रात वळवळ करू लागल्यात’- राज ठाकरे
‘शरद पवारांच्या राजकारणामुळे निजामांच्या अवलादी महाराष्ट्रात वळवळ करू लागल्यात’- राज ठाकरे






