Share

Sachin kumavat : अहिराणी गाण्यांनी गाजवला सोशल मिडीया, बॉलिवूडलाही टाकलं मागे, कोटींच्या घरात व्ह्युज

Sachin kumavat | सोशल मिडीयावर काय व्हायरल होईल काहीही सांगता येत नाही. आता सध्या सोशल मिडीयावर अहिराणी गाण्यांचा बोलबाला सुरू आहे. या गाण्यांनी मराठी काय तर बॉलिवूड गाण्यांनाही मागे टाकलं आहे. या गाण्यांना लाखोंच्या घरात व्ह्युज येत आहेत.

यावरून असं दिसत आहे की अहिराणी इंडस्ट्री पुन्हा उभी राहते आहे. एक काळ होता की, अहिराणी इंडस्ट्रीकडे शहरातील लोकं बघत पण नव्हते. पण आता याच अहिराणी इंडस्ट्रीतील गाण्यांनी सगळ्यांना वेड लावले आहे. काळ बदलत चालला आहे.

युट्यूब असो किंवा इन्स्टाग्रामचे रिल्स सगळीकडे अहिराणी गाणी वाजताना दिसत आहेत. लग्नामध्येही आता हिंदी किंवा मराठी गाण्यांपेक्षा अहिराणी गाण्यांची डिमांंड वाढली आहे. सचिन कुमावत या शेंदुर्णीच्या युवकाने २००५ साली अहिराणी गाणी सिडी, डिव्हीडीच्या स्वरूपात बाजारात आणली होती.

गाण्यांची चर्चा झाली पण पडद्यामागचा कलाकार तसाच राहिला. तो प्रकाशझोतात आला नाही. पण सोशल मिडीया आल्यापासून सगळीकडे सध्या त्यांचीच चर्चा सुरू आहे. आता सचिन कुमावत या नावाला अहिराणी इंडस्ट्रीचा सलमान खान म्हणतात.

मुंबई गयी, मी दिल्ली गयी, या गाण्यापासून एरंडोल येथीलल पुष्पा ठाकूर प्रसिद्ध झाल्या. आज पुष्पा ठाकूर यादेखील अहिराणी इंडस्ट्रीच्या आघाडीच्या नायिका आहेत. त्यांनाही सध्या खुप डिमांड आहे. सचिन कुमावत यांचे युट्यूबवर लाखोंच्या घरात सब्सक्राईबर आहेत. अशी बरीच अहिराणी गाणी आहेत ज्यांना लाखोंच्या आणि कोटींच्या घरात व्ह्युज आहेत.

जसं की, केसावर फुगे या गाण्याला २ कोटींपेक्षा जास्त व्हु्युज आहेत. तसेच सावन ना महिमा मा या गाण्याला ९८ लाख व्ह्युज आहेत. अहो मामी तुमची पोरगी लय सुंदर हे गाणं आज प्रत्येकाला माहिती आहे. या गाण्याला ७१ लाख व्ह्युज आहेत. राजा तू तू मना राजा या गाण्यालाही ५० लाखांपेक्षा जास्त व्ह्युज आहेत. हे व्ह्युज पाहता आता सगळं मार्केट या गाण्यांनी गाजवलं आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही.

ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now