भविष्यात अधिकारी व्हावं अशी स्वप्ने अनेक तरुण तरुणी पाहत असतात. त्यासाठी काही तरुण-तरुणी मेहनत घेऊन अधिकारी सुद्धा बनतात. पण अहमदनगरमधून एका जोडप्याने कमालच करुन दाखवली आहे. ते पती-पत्नी एकाचवेळी उत्तीर्ण होऊन अधिकारी बनले आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एक यादी जाहीर केली होती. त्यामध्ये एकाचवेळी पती-पत्नीचे नाव समोर आले आहे. सुरेश चासकर आणि मेघना चासकर अशी या जोडप्याची नावं आहे. त्या दोघांची महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परिक्षेत दोघांची वर्ग १ पदी निवड झाली आहे.
सुरेश आणि मेघना यांचे लग्न २०२२ मध्ये झाले होते. मेघना चासकर या मूळ कोपरगाव तालुक्यातील येसगाव आहे. कैलास दरेकर आणि जयश्री दरेकर यांच्या त्या कन्या आहे. तर सुरेश हा सिन्नर तालुक्यातील रहिवासी आहे. सुरेश आणि मेघना या दोघांनाही आधीपासून अधिकारी बनायचे होते.
दोघांनी नोकरी आणि संसार सांभाळून दोघांनी स्पर्धा परिक्षांची तयारी सुरु केली होती. त्यांना कुटुंबाने सुद्धा साथ दिली. तसेच त्यांनी एकमेकांना सांभाळून घेतल्यामुळे आता ते दोघेही अधिकारी बनले आहे. त्यामुळे सगळीकडून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मार्फत अनेक पदांसाठी परीक्षा होत असतात. त्यामध्ये महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा घेतली जाते. ती परीक्षा सुरेश आणि मेघना यांनी दिली होती. त्यानंतर या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. त्यामध्ये पती-पत्नी दोघेही उत्तीर्ण झाले आहे.
सुरेश आणि मेघना यांनी कोपरगावच्या संजिवनी अभियांत्रिकी महाविद्यालयातून दोघांनी पदवीपर्यंतचे शिक्षण पुर्ण केले आहे. मेघना यांनी के के वाघ या महाविद्यालयातून पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यानंतर २०२२ मध्ये लग्न झाल्यानंतरही त्यांनी स्पर्धा परिक्षेचा अभ्यास सुरु ठेवला होता.
महत्वाच्या बातम्या-
…तर तुम्हाला थेट बुलडोझर खाली घालू; नितीन गडकरी रस्त्याच्या ठेकेदारांवर संतापले
भर लग्नात राडा! बापाने नवरदेवाच्या कानाखाली वाजवली, नवरदेवानेही बापाला चोपले; कारण वाचून धक्का बसेल
नवरदेव सतत जात होता नवरीच्या खोलीत, कारण कळताच उडाला भडका; लग्नमंडपातच तुफान राडा