Share

अग्निपथ योजनेमुळे देशभरात हिंसाचार करणाऱ्यांमागे ‘या’ लोकांचा हात, धक्कादायक माहिती आली समोर

मोदी सरकारने सैन्यात भरती होण्यासाठी अग्निपथ योजनेची घोषणा केली आहे. पण या योजनेमुळे देशभरात एकच खळबळ उडाली आहे. या विरोधात विविध राज्यांमध्ये तरुण आंदोलन करत आहे. अनेक ठिकाणी तर गाड्याही जाळल्या जात आहे. त्यामुळे आंदोलन करणाऱ्यांवर पोलिस कारवाई करत आहे.

अशात ‘अग्निपथ’ योजनेच्या विरोधात हिंसक आंदोलन केल्याबद्दल उत्तर प्रदेश आणि बिहार पोलिसांनी आतापर्यंत अनेक जणांना ताब्यात घेतले आहे. अलीगडचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक (एसएसपी) कलानिधी नैथानी यांनी याबाबत माहिती दिली आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये हिंसा करणाऱ्यांमागे कोचिंग क्लासेसचा हात असल्याची माहिती समोर आली आहे.

नैथानी म्हणाले की, शुक्रवारी झालेल्या हिंसाचारानंतर आतापर्यंत ३५ जणांना अटक करण्यात आली आहे. यापैकी नऊ कोचिंग ऑपरेटर आहेत ज्यांना हिंसाचारात त्यांनी घेतलेल्या भूमिकेसाठी आणि केलेल्या हिंसाचारासाठी अटक करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील हिंसाचाराच्या संदर्भात भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कलमांतर्गत चार एफआयआर नोंदवण्यात आले आहेत, अशी माहितीही नैथानी यांनी दिली आहे. यापैकी दोन एफआयआर पोलिस कर्मचार्‍यांच्या तक्रारीवरून, एक उत्तर प्रदेशच्या तक्रारीवरून दाखल करण्यात आला आहे.

नैथानी म्हणाले की, शुक्रवारपासून सुरू झालेल्या हिंसाचारात सहभागी असलेल्यांना अटक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत सुमारे ८० जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच पोलिस सोशल मीडियावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. सैन्य भरतीसाठी इच्छुक उमेदवारांच्या प्रदर्शनादरम्यान कोचिंग ऑपरेटर्सनी असामाजिक तत्वांना असा हिंसाचार करण्यासाठी प्रवृत्त केले आहे.

दरम्यान, पाटण्याचे जिल्हाधिकारी चंद्रशेखर यांनी म्हटले की, अटक करण्यात आलेल्या तरुणांच्या मोबाईलमध्ये काही कोचिंग सेंटरचे व्हिडिओ फुटेज, व्हॉट्सऍप चॅट्स मिळाल्या आहेत. त्यावरुन जे कोचिंग सेंटर यात गुंतलेले आहे, त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.

महत्वाच्या बातम्या-
महाबळेश्वर फिरण्यासाठी येणाऱ्यांकडे इलेक्ट्रिक वाहने आवश्यक; महापालिकेने घेतला मोठा निर्णय
बड्या पक्षाच्या आमदाराने स्वत:च्याच लग्नात लावली गैरहजेरी, संतापलेल्या नवरीने उचललं ‘हे’ धक्कदायक पाऊल
विधान परिषदेच्या तोंडावर रवी राणांना झटका; अमरावती पोलिसांकडून अटक वॉरंट जारी

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now