Share

ईडीची धास्ती! आमदारांच्या बंडाचे लोण आता खासदारांपर्यंत; भाजप सोबत जाण्याची करतायेत मागणी

udhav thackeray

गेल्या काही दिवसांपासून राज्यात केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवायांचा सपाटा सुरु असल्याचं दिसत आहे. यामध्ये प्रामुख्यानं महाविकास आघाडी सरकारमधील अनेक बडे नेते रडावर आहेत. कारवाईवरून शिवसेना नेते आणि त्यांचे निकटवर्तीय केंद्रीय तपास यंत्रणेच्या रडारवर असल्याचे दिसत आहे.

तसेच केंद्रातील सरकार पदाचा दुरुपयोग करून त्रास देत असल्याचा आरोप शिवसेनेने अनेकदा केला आहे. केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवायांना कंटाळूनच आता शिवसेनेच्या काही आमदारांनी बंड केल्याचे आता राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. भाजपमध्ये चला अशी मागणी आमदारांची असल्याच बोललं जातं आहे.

धक्कादायक बाब म्हणजे आमदारांचे हे बंडाचे लोण आता खासदारांपर्यंत येवून पोहोचले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आता शिवसेनेच्या खासदारांमधूनही अशाप्रकारची मागणी होऊ लागली असल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे आता शिवसेनेचे खासदार ही बंडाच्या तयारीत असल्याच बोललं जातं आहे.

मुख्यमंत्री पदावरून भाजप – सेना यांची युती तुटली. अन् शिवसेनेने राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसच्या सोबतीने राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं. मात्र तेव्हापासून भाजप राज्य सरकारवर सडकून टीका करत आहे. सत्ताधारी नेत्यांवर ईडीचा ससेमिरा लावला जात आहे.

नुकतीच अनिल परब यांना देखील ईडीची नोटिस आली आहे. अनेकदा शिवसेना नेत्यांच्या मागे ईडीचा ससेमिरा लावला जात असल्याचा खळबळजनक आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील केला होता. तर आता सेनेचे तब्बल सहा खासदारही ईडीच्या रडारवर असून त्यांच्याकडूनही आता भाजपाबरोबर जाण्याची मागणी होत आहे.

यामुळे आता शिवसेनेचे खासदार पण बंड करणार का? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. तर दुसरीकडे शिंदे यांनी शिवसेनेविरोधात केलेल्या बंडखोरीबद्दल आता एक मोठी माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात पुकारलेल्या बंडखोरीची स्क्रिप्ट दोन महिन्यापूर्वीच तयार करण्यात आली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरील नाराजीमुळे एकनाथ शिंदे यांनी बंड केले आहे.  शिवसेनेच्या एका आमदाराने यासंदर्भात माहिती दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या
एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना दणका, भरत गोगावलेंची पक्ष प्रतोदपदी केली निवड
अखेर बंडखोर शिवसेना आमदाराने सांगितले नाराजीचे खरे कारण; जाणून घ्या…
पाकिस्तानने नुपूर शर्माचा मुद्दा संयुक्त राष्ट्रात उकरून काढला, भारताने ‘अशी’ केली बोलती बंद
अपहरण झालेले आमदार देशमुख परतले; म्हणाले, ‘मी उद्धव ठाकरेंचा शिवसैनिक असून मला बळजबरीने…’

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now