राज्यात शिंदे – फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून शिवसेनेला लागलेली गळती काही केल्या थांबण्याच नाव घेत नाहीये. महत्वाची बाब म्हणजे एक – दोन नव्हे तर तब्बल शिंदे गटात शिवसेनेचे तब्बल ३७ आमदार सामील झाले आहेत. शिंदे यांनी केलेल्या या बंडामुळे अख्ख महाविकास आघाडी सरकार कोसळलं आहे.
तर आता शिवसेनेच्या आमदारांनंतर खासदारही बंडाच्या तयारीत आहेत. भाजपसोबत युती करण्याची भूमिका शिवसेनेच्या १५ खासदारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे मांडली. यामुळे आता उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. येणाऱ्या काळात राजकीय समीकरण बदलणार का? हेही आता पहावे लागेल.
नुकत्याच झालेल्या बैठकीत खासदारांनी उद्धव ठाकरेंकडे भाजप सोबत जाऊ अशी मागणी करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यामुळे आता आमदारांपाठोपाठ खासदारही शिंदे गटात सामील होतं असल्याच पाहायला मिळत आहे. मात्र अद्याप तरी उद्धव ठाकरेंनी याबाबत हिरवा कंदील दिलेला नाहीये.
बैठकीत नेमकं काय घडलं?
शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी बैठकीत काय घडलं याबाबत माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना, भाजपचे खासदार काँग्रेस, राष्ट्रवादीच्या विरोधात लढून विजयी झाले आहेत. त्यामुळे आपण भाजपसोबत जाऊया, अशी भूमिका शिवसेनेच्या १५ खासदारांनी बैठकीत मांडल्याच लोखंडे यांनी सांगितलं.
दरम्यान, यासंदर्भात आता पुन्हा बैठक होणार आहे. त्यातदेखील आम्ही आमची भूमिका मांडू, असं सदाशिव लोखंडे यांनी सांगितलं आहे. आमदारांपाठोपाठ खासदारांच्या मनात असंतोष असल्याच पाहायला मिळत आहे. यामुळे सध्या उद्धव ठाकरेंसमोर आता नवा पेचप्रसंग निर्माण झाला आहे.
विशेष बाब म्हणजे राज्यात शिंदे – फडणवीस स्थापन झाल्यापासून शिवसेनेतील खासदार उद्धव ठाकरेंकडे भाजपसोबत जाऊ अशी मागणी करत आहेत. मात्र अद्याप तरी उद्धव ठाकरेंनी यावर भाष्य केलेलं नाहीये. मात्र खासदारांनीदेखील बंड करत शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय घेतला. तर शिवसेनेला मोठा फटका बसेल, ही शक्यता नाकारता येत नाही.
महत्वाच्या बातम्या :-
“आमदारांना अगोदर डुक्कर,गद्दार अशी विशेषणे लावायची आणि मग…”, मनसेचा आदित्य ठाकरेंवर निशाणा
शिवसेनेच्या आंदोलनात लहान मुलांना पाहून भाजपने लगावला टोला, म्हणाले, शिल्लक सेनेकडे…
तुझ्यासारखी सुजाण, सुज्ञ.., पत्नीच्या वाढदिवसानिमित्त एकनाथ शिंदेंची खास पोस्ट
आमदारांपाठोपाठ खासदारांचाही उद्धव ठाकरेंना धक्का, उचललं मोठं पाऊल, शिवसेनेचं काय होणार?